*कोंकण Express*
*अल्पवयीन युवतीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी तरुणास सशर्त जामीन मंजूर*
*कणकवली ः प्रतिनिधी*
इन्स्ट्राग्रामवर ओळख झालेल्या अल्पवयीन मुलीशी ती अनुसूचित जातीची आहे, हे माहित असतानाही वेळोवेळी शारिरीक अत्याचार केल्याप्रकरणी तुषार सत्यवान परभू रा. मुटाट-देवगड याची विशेष न्यायाधिश तथा अतिरीक्त सत्र न्यायाधिश श्रीमती एस. एस. जोशी ५० हजारच्या सशर्थ जातमुचलक्यावर मुक्तता केली. संशयिताच्यावतीने ॲड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.
२०२२ मध्ये इन्स्ट्राग्रामवर ओळख बाढवून, मैत्री करून अल्पवयीन मुलीला वेगवेगळ्या ठिकाणी जबरदस्तीने नेऊन शारिरीक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या आरोपीला उपविभागिय पोलीस अधिकाऱ्यांनी २७ जानेवारी २०२४ रोजी भादवी 376,354 बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा कलम 4,6,8,10,12 अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम तीन अन्वये अटक केली होती. ३१ जानेवारी २०२४ तो पोलीस कोठडीत होता.
दरम्यान, त्याच्यावतीने दाखल करण्यात आलेल्या जामिन अर्जावर झालेल्या सुनावणीनंतर अशाप्रकारचा गुन्हा परत करू नये. पिडीत मुलींशी संपर्क साधू नये आदी अटींवर ५० हजार रुपयांचा जामिन मंजूर करण्यात आला.