*कोंकण Express*
*नवीन कुलीऺ॔ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय उपयोगी वस्तूंचे होणार वाटप…*
*राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य…*
*फोंडाघाट ः प्रतिनिधी*
शरद पवार राष्ट्रवादी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांचा वाढदिवस शुक्रवार दिनांक 21 जून 2024 रोजी फोंडाघाट येथील नवीन कुली॔ वसाहत तेथे साजरा करण्यात येणार आहे यानिमित्त सेवाभावी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नवीन कुरली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गरजू विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप कणकवली शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष श्री अनंत पीळणकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे.