कोकण बोर्ड अव्वल स्थानावर तर स्पर्धा परीक्षेत सुद्धा अव्वलच हवा ; सत्यवान यशवंत रेडकर

कोकण बोर्ड अव्वल स्थानावर तर स्पर्धा परीक्षेत सुद्धा अव्वलच हवा ; सत्यवान यशवंत रेडकर

*कोंकण Express*

*कोकण बोर्ड अव्वल स्थानावर तर स्पर्धा परीक्षेत सुद्धा अव्वलच हवा ; सत्यवान यशवंत रेडकर*

*(२५८व्या निशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यानात झाराप येथे विद्यार्थ्यांना संबोधन)*

कोकण भूमिपुत्र व संपूर्ण महाराष्ट्रात तिमिरातूनी तेजाकडे ही यशस्वी व झंजावाती व्याख्यानां द्वारे शैक्षणिक चळवळ राबवणारे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र, मा. श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांनी दिनांक १९ मे २०२४ रोजी झाराप मधील समविचारी ग्रामस्थांच्या सहकार्याने पू.प्रा.केंद्रशाळा, झाराप येथे २५८वे मोफत स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन केले. “कोकणातून फक्त बोर्डात अव्वल स्थानावर विद्यार्थी येतात परंतु मी माझ्या ज्ञानदानाद्वारे स्पर्धा परीक्षेत सुद्धा कोकण अव्वल स्थानावर आणण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहे व राहणार” असे प्रतिपादन सत्यवान यशवंत रेडकर यांनी केले.

विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची माहिती व्हावी, स्पर्धा परीक्षांबद्दल आकर्षण निर्माण होऊन स्पर्धा परीक्षेसाठी काय करावे व परीक्षेची तयारी कशी करावी? याचे ज्ञान मिळावे या दृष्टिकोनातून स्पर्धा परीक्षेची माहिती देण्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून तिमिरातुनी तेजाकडे या संस्थेचे संस्थापक, मुंबई सीमशुल्क चे कनिष्ठ अनुवाद अधिकारी, श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांना आमंत्रित केले होते, त्यांनी उपस्थितांना स्पर्धा परीक्षेबाबत हसत खेळत व आनंदमयी वातावरणात सविस्तर मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!