*कोंकण Express*
*ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्टस्, कळसुलीचा निकाल ९८.२१%*
कळसुली शिक्षण संघ, मुंबईचे
ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्टस्, कळसुली
ता. कणकवली प्रशालेचा HSC बोर्डाचा निकाल –
कला शाखा १००% व वाणिज्य शाखा ९७.४३% असा एकूण ९८.२१% एवढा लागला आहे. यात कला शाखेमधून १७ व वाणिज्य शाखेमधून ३९ असे एकूण ५६ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते. त्यातील कला शाखेतून सर्व १७ विद्यार्थी तर वाणिज्य शाखेतून ३८ असे एकूण ५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात प्रथम तीन क्रमांकांनी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पुढील प्रमाणे आहेत.
कला शाखा –
प्रथम – कु. संध्या अनंत गुरव ६३.१७%,
द्वितीय – कु. अनुष्का रामचंद्र राणे ६२.८३%,
तृतीय – कु. पियुष उत्तम कासले ६१.८३%
वाणिज्य शाखा –
प्रथम – कु. श्रावणी विजय घाडीगावकर ८५.३३%,
द्वितीय – कु. किरण विजय गुरव ८०.५०%,
तृतीय – कु. लविणा अंकुश कदम ७७.६७%
यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष मा. पुरुषोत्तम सदाशिव दळवी, कार्याध्यक्ष – मा. सूर्यकांत राजाराम दळवी, सरचिटणीस- मा. विजय पांडुरंग सावंत, सर्व संस्था पदाधिकारी तसेच स्कूल कमिटी चेअरमन – मा. श्री. के. आर. दळवी, व्हाईस चेअरमन – मा. नामदेव घाडीगावकर, सदस्य – मा. श्री. रजनीकांत बळीराम सावंत व सर्व सदस्य, शिक्षक पालक संघ उपाध्यक्ष – मा. श्री. जयवंत घाडीगावकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष- मा. श्री. शिवाजी गुरव तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी ग्रामस्थ पालक यांनी अभिनंदन केले आहे.