बांधकाम विभाग यावर्षी दहा हजार झाडे लावून संवर्धन करणार ;  अजयकुमार सर्वगौड

बांधकाम विभाग यावर्षी दहा हजार झाडे लावून संवर्धन करणार ;  अजयकुमार सर्वगौड

*कोंकण Express*

*बांधकाम विभाग यावर्षी दहा हजार झाडे लावून संवर्धन करणार ;  अजयकुमार सर्वगौड*

*नर्सरीच्या गावा जावुनिया यावा*

महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री आदरणीय श्री.रवींद्र चव्हाण साहेब यांनी बांधकाम खात्याचा कारभार गतिमान आणि पारदर्शक केलेला आहे. या बांधकाम खात्याला अप्पर मुख्य सचिव म्हणुन सौ. मनिषा म्हसकर मॅडम हया लाभलेल्या आहेत. त्या सुध्दा बांधकाम खात्याचा कारभार नियमबध्द आणि शिस्तबध्द करण्याचा कसोशीने प्रयत्न करीत आहेत.
आदरनीय अप्पर मुख्य सचिव सौ. मनिषा म्हसकर मॅडम हया अंत्यंत हुशार आणि बुध्दीमान आहेत. त्या बांधकाम खात्याचा कारभार शिस्तबध्द व नियमबध्द करण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असून सध्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत लाखो झाडे लावण्याच्या दृष्टीने त्या अंत्यंत प्रयत्नशील आहेत. त्‍यांनी बांधकाम खात्यातील सर्व विभाग प्रमुखांना राजमुद्री (आंध्रप्रदेशातील राजमुद्री) येथे जावुन नर्सरी पाहून येण्याचे निर्देश दिले.त्यानुसार मी स्वतः , अधीक्षक अभियंता सौ. छाया नाईक मॅडम, रत्नागिरी चे कार्यकारी अभियंता श्री. ओटवणेकर, कनिष्ठ अभियंता श्री. तांबे आम्ही सर्वजण दि. 11-5-2024 रोजी राजमुद्री येथे असणार्‍या झाडाच्या नर्सरी पाहण्यासाठी गेलो. मला सांगायला आनंद अणि आश्चर्य वाटेल की, या ठिकाणी सर्व प्रकारची झाडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. राजमुद्री येथील नर्सरी पाहुन अक्षरश: मन भारावुन गेले अणि डोळे अक्षरशः भरून आले.आशिया खंडातील सर्वात मोठया नर्सरी या ठिकाणी आहेत. याठिकाणी नर्सरी तयार करण्याचा पिढयान -पिढ्यांचा व्यवसाय आहे. या ठिकाणी च्या झाडां च्या विविध नर्सरी पाहुन मला सुध्दा झाडे लावण्या साठी मोह आता आवाराने शक्य नाही. म्हणुन मी आणि माझे सार्वजनिक बांधकाम विभागातील सर्व अभियंता या वर्षी किमान सा.बां.विभागामार्फत 10,000 झाडे लावणार अणि जागणार सुद्धा आहोत *विशेष म्हणजे ह्या नर्सरी पाहण्याचा योग आदरणीय अप्पर मुख्य सचिव सौ मनीषा म्हैसकर यांच्या मुले आला मी त्याचा अत्यंत आभारी अणि ऋणी आहे*
मित्रहो जीवनामध्ये एकदा तरी आंध्रप्रदेशातील राजमुद्री येथे पाहुन यावे. अपार कष्ट घेऊन राजमुद्री येथील लोक मोठया प्रमाणात झाडे लावतात आणि जगवतात ही बाब वाखाटण्या जोगी आहे. विशेष म्हणजे हजारो एकरावर नव्हे तर लाखो एकावर करोडो च्या संख्येने या ठिकाणी नर्सरी मध्ये झाडे आहेत या ठीकाणी सर्व प्रकारची झाडे 8 ते 10 फुट उंचीची असून विक्रीसाठी अगदी नाम मात्र किमतीत उपलब्ध आहे राजमुद्री येथे नर्सरी चा हा व्यवसाय पिढ्यानपिढ्या चा आहे एवढी लाखो करोडो झाडे पाहून माझे डोळे दिपले आहेत म्हणुनच आवर्जुन सांगावयासे वाटते. *नर्सरीच्या गावा जावुनिया यावा.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!