*कोंकण Express*
*लग्नाचा बहाणा करून फसवणूक करणाऱ्या टोळीतील संशयित आरोपी अझीझ सुलेमान नाईक ह्यांना अटक पूर्व जामीन मंजूर..*
*आरोपीच्या वतीने अशपाक शेख यांचा यशस्वी युक्तिवाद*
*ओरोस ः प्रतिनिधी*
याबाबत सविस्तर वूर्त असे की कुडाळ तालुक्यातील एका 42 वर्षीय व्यक्तीला लग्नाचा बहाणा करून त्याची सुमारे एक लाख चाळीसहजार (१४००००)रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी कुडाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या या टोळीतील संशयित आरोपी संतोष काकडे (वय 37रहा. शिरोली ता.करवीर .जी कोल्हापूर संतोष जगदाळे वय 40 रहा.दहिवडी विशाल थोरात वय ३४ उंदीरगाव भारती ठोंबरे ज्योती शेलार वय ४३ ममता पगारे वय 37 किरण पगारे शिर्डी.रुपाली पाटिल वय 35 पंढरपूर ह्या नऊ आरोपींना या पूर्वी अटक होऊन पोलिस कस्टडी नंतर नायालयीन कस्टडी होवून जामिनावर मुक्तता झालेली आहे. दरम्यान आरोपी क्रमांक 2 आजिझ सुलेमान नाईक.वय 70 हे लग्न जमवणारे एजंट होते..ह्यांनी अटकपूर्व जामिनासाठी प्रमुख जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती.आरोपीचे विद्वान विधीज्ञ अशपाक शेख ह्याचा कडून आरोपीची कस्तोडियाल इस्त्रोग्रेशन ची आवश्यकता नाही तसेच ह्या आरोपीचे रेकोवरी शी संबंध नाही.आरोपी तपस्कामात सुरवातीपासून सहकार्य करत आहे.अश्याप्रकरचा युक्तिवाद मे कोर्टासमोर मांडण्यात आला आरोपीचे वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य मानून आरोपीचा अटक पूर्व जामीन प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश श्री एच बी गायकवाड यांनी मंजूर केला.