*कोंकण Express*
*कासार्डे माध्यमिक विद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*
कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आली.
स्कुल कमिटी चेअरमन अरविंद कुडतरकर यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक एन.सी. कुचेकर,पर्यवेक्षक एस.डी. भोसले, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थीवर्ग उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त इयत्ता पाचवी मधील कु.समृध्दी प्रकाश चौगुले हिने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकत भाषण सादर केले.या शिवाय शिक्षकांमधून सौ.ऋचा सरवणकर व श्री. आर.व्ही. राऊळ यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर याचा जीवनपट उलगडून विद्यार्थ्यांसमोर कथन केला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार विद्यालयाचे शिक्षक ए.पी. घुले यांनी केले व कार्यक्रमाची सांगता झाली.