*कोंकण Express*
*दिगवळे येथील उबाठा सेनेचे कार्यकर्ते सचिन देसाई यांचा भाजपात प्रवेश*
*उ.भा.ठा ला लागतायेत एकापाठोपाठ एक धक्के*
दिगवळे बामंदेवाडी येथील उबाठा सेनेचे कार्यकर्ते सचिन कृष्ण देसाई यांनी आज कनेडी येथील मेळाव्यात भारतीय जनता पार्टी मध्ये पक्ष प्रवेश केला. आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन सचिन देसाई यांनी हा प्रवेश केला. केद्रीय उद्योग मंत्री तथा भाजप नेते नारायण राणे यांच्या हस्ते त्यांना भाजप ची शाल घालून पक्षात स्वागत करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर आमदार नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा उपाध्यक्ष संदेश सावंत, माजी जि प अध्यक्ष संजना सावंत, शिवसेना उपजिल्हाप्रमुख महिंद्र सावंत, भाजपा अनुसूचित जाती जमाती जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, सुरेश सावंत, सांगवे संजय सावंत, सुरेश ढवळ, दारीसते उपसरपंच संजय सावंत, विजय बोभाटे आदी उपस्थित होते.