*कोंकण Express*
*देवगड येथील साळशी व तोरसोळे उ.बा.ठा गटाचे कार्यकर्ते जगन्नाथ मिराशी माजी देवस्थान समिती चेअरमन, शांताराम मिराशी विकास सोसायटी सदस्य, यांच्यासह अनेक कार्यकर्ते भाजपात प्रवेश*
*आमदार नितेश राणे यांच्या विकास कामांचा धडाका बघून पक्षप्रवेश*
देवगड येथील साळशी व तोरसोळे उबाठा सेनेचे कार्यकर्ते जगन्नाथ मिराशी माजी देवस्थान समिती चेअरमन, शांताराम पा. मिराशी विकास सोसायटी सदस्य,अनिल विष्णू मिराशी, सतीश अर्जुन कदम, अशोक अनंत सावंत, अनंत शिवराम सावंत यांनी आज शिरगाव येथे संदीप साटम यांच्या वाढदिवस अवचित्य साधून भारतीय जनता पार्टी मध्ये पक्ष प्रवेश केला. आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन हा प्रवेश केला.
यावेळी व्यासपीठावर आमदार नितेश राणे, संतोष किंजवडेकर,अमित साटम, संदीप साटम आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.