*कोंकण Express*
*केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांचे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा*
*कणकवली ः प्रतिनिधी*
केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. राणे यांच्या ओम गणेश निवासस्थानी जात अबिद नाईक यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी नामदार राणे यांचे अभिष्टचिंतन केले. यावेळी जिल्हा प्रतिनिधी अनिस नाईक, निशिकांत कडुलकर, बाबू सावंत, अमित केतकर, गणेश चौगुले, केदार खोत, इम्रान शेख आदी उपस्थित होते.