*कोंकण Express*
*रोटरी क्लब वेंगुर्ला मार्फत वेंगुर्ला येथे दि.१४ एप्रिल रोजी सर्जिकल तपासणी शिबिराचे आयोजन*
*वेंगुर्ले ः प्रतिनिधी*
रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन मार्फत रविवार दि. १४ एप्रिल २०२४ रोजी डॉ उबाळे यांच्या संजीवनी हॉस्पिटल येथे मोफत सर्जिकल तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरासाठी मुंबई येथून उच्च शिक्षण घेऊन आलेले डॉ अनिकेत वजराटकर, MBBS, MS (जनरल सर्जरी) F.I.S.C.P.(कन्सल्टंट लेरोस्कोपीक अँड जनरल सर्जन) व डॉ सौ मोनालिसा वजराटकर, MBBS,MS (जनरल सर्जरी), कन्सल्टंट लेरोस्कोपीक अँड जनरल सर्जन) हे उपस्थित राहणार आहेत.
या सर्जिकल शिबिरामध्ये पोट दुखी व पोटाचे आजार, संडासातून रक्त जाणे, जळजळ होणे, हर्निया चा आजार,मुळव्याध(piles),भगेंदर आजार,पित्ताशयातील खडे,स्त्रियांच्या स्तनातील गाठी व इतर स्तनांचे आजार, व्हेरीकोज व्हेनचा आजार, बद्धकोष्टता(Constipation), शुगर मुळे झालेल्या जखमा,लघवीच्या जागेचे व अंडाशयाचे आजार इत्यादी आजारांची मोफत तपासणी केली जाणार आहे.
या शिबिराची वैशिष्ट्ये म्हणजे शिबिरातील रुग्णांना ऑपरेशन वर ५०% सूट मिळणार आहे सोबतच मूळव्याध व फिशर वर लेझर द्वारे ऑपरेशन, तसेच आवश्यक तिथे मुळव्याध व फिशर वर ऑपरेशन शिवाय नवीन बिनटाक्याचे उपचार, पित्ताशयातील खडे व अपेंडिक्स वर दुर्बिणीद्वारे ऑपरेशन, आवश्यकता असल्यास सोनोग्राफी केली गेल्यास त्यावर ५०% सूट असणार आहे.शिबिरात वैद्यकीय तपासणी आणि रुग्णालय फी पूर्णतः मोफत असणार आहे.
या शिबिरासाठी आगाऊ नोंदणी करणे आवश्यक आहे.शिबिरात मर्यादित रुग्ण तपासले जाणार असल्याने प्रथम नोंदणी करणाऱ्यांना संधी मिळेल त्यासाठी गरजू रुग्णांनी 9423893939 व 7276608281 या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनचे प्रेसिडेंट श्री शंकर तथा राजू वजराटकर, सेक्रेटरी योगेश नाईक इव्हेंट चेअरमन डॉ राजेश्वर उबाळे तसेच रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन मार्फत करण्यात येत आहे.