*कोंकण Express*
*सिने कलाकार संस्थेच्या कोकणप्रांत अध्यक्ष पदी विजय देसाई*
*नालासोपारा ः प्रतिनिधी*
पत्रकारिता तथा सामाजिक क्षेत्रात आपला विशेष ठसा उमटविणारे वसई तालुक्यातील पत्रकार विजय देसाई यांची सिने/टेली कलाकार संस्थेच्या कोकणप्रांत अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र पाटील सचिव डॉ वैष्णवी बुटे, सुप्रिया घाडीगांवकर यांनी नियुक्ती केल्याचे पत्र दिले आहे
आपण संघटनेच्या हितासाठी व कलाकारांना न्याय मिळवून देण्यासाठी भरीव योगदान देऊ अशी प्रतिक्रिया विजय देसाई यांनी दिली. पा प्रसंगी अध्यक्ष नरेंद्र पाटील, कलाकार मनीष राऊत आदी कलाकार मंडळी उपस्थित होते, देसाई ह्यांच्या नियुक्ती मुळे कलाकार मंडळीत उत्सवाचे वातावरण असून देसाई यांचे अनेक क्षेत्रातून अभिनंदन करण्यात आले.