फोंडाघाट विभागातून ९० टक्के मतदान होण्यासाठी सर्वांनी मेहनत घेऊया;आमदार नितेश राणे यांचे आवाहन

फोंडाघाट विभागातून ९० टक्के मतदान होण्यासाठी सर्वांनी मेहनत घेऊया;आमदार नितेश राणे यांचे आवाहन

*कोंकण Express*

*फोंडाघाट विभागातून ९० टक्के मतदान होण्यासाठी सर्वांनी मेहनत घेऊया;आमदार नितेश राणे यांचे आवाहन*

*महायुतीचे सरकार येताच २८ कोटी ४३ लाखाचा विकासनिधी फोंडाघाट विभागाला दिला*

*फोंडाघाट विभागाला निधीची कमतरता पडू देणार नाही*

*फोंडाघाट ः प्रतिनिधी*

लोकसभेला महायुती चे उमेदवार नारायण राणे यांना फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघातून ९० टक्के मतदान व्हायला हवे. आजवर फोंडाघाट विभागातून झालेंल्या एकूण मतदानापैकी ५० टक्के मतदान आम्हाला झाले. ही आकडेवारी कमी आहे. केंद्रीयमंत्री राणेंना अपेक्षित असलेले ९० टक्के मतदान होण्यासाठी सर्वांनी मेहनत घेऊया असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले.
राज्यात विरोधी पक्षाची सत्ता असतानाही मी विकासनिधी कमी पडू दिला नाही. मागील अडीच वर्षात सत्ताधारी आमदार म्हणून २८ कोटी ४३ लाख विकासनिधी फोंडा विभागाला मी दिला आहे. याबदल्यात मला ९० टक्के मतदान महायुती ला व्हायला हवे ही माझीही हक्काची मागणी आहे असे आमदार नितेश राणे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत फोंडाघाट विभागाचा महायुती कार्यकर्ता संवाद मेळावा राधाकृष्ण मंगल कार्यालय फोंडाघाट येथे संपन्न झाला.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, कणकवली विधानसभा प्रमुख मनोज रावराणे, भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे, मिलिंद मेस्त्री,फोंडाघाट सरपंच सौ. संजना आग्रे, लोरे नं 1 सरपंच अजय रावराणे, पियाळी सरपंच प्रवीण पन्हाळकर, कोंडये सरपंच ऋतुराज तेंडुलकर, फोंडाघाट उपसरपंच तन्वी मोदी, घोणसरी उपसरपंच दीप्ती कारेकर, डॉ. मिलिंद कुलकर्णी, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष राजेंद्र पावसकर, फोंडाघाट विकास सेवा सोसायटी चेअरमन राजन नानचे, फोंडाघाट एजुकेशन सोसा. चेअरमन सुभाष सावंत, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तुळशीदास रावराणे, माजी सभापती सदानंद उर्फ बबन हळदिवे, माजी सभापती सुजाता हळदिवे, शक्ती केंद्र प्रमुख विश्वनाथ जाधव, गजानन सावंत, नरेश गुरव, वाघेरी माजी सरपंच संतोष राणे, नवीन कुर्ली वसाहत चे राजेंद्र कोलते, शिवसेना विभाग प्रमुख शांताराम राणे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!