_माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण (एमसीएमसी) समितीचे प्रशिक्षण संपन्न_

_माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण (एमसीएमसी) समितीचे प्रशिक्षण संपन्न_

*कोंकण Express*

*_माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण (एमसीएमसी) समितीचे प्रशिक्षण संपन्न_*

*जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण तसेच पेड न्यूजवर लक्षे ठेवणे हे ‘एमसीएमसी’ चे प्रमुख कार्य*

*-जिल्हा निवडणूक अधिकारी किशोर तावडे*

*सिंधुदुर्गनगरी दि.10 (जिमाका)*

राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणिकरण, प्रिंट माध्यमात येणाऱ्या जाहिराती व मजकूर या माध्यमातून पेड न्यूज तर जात नाही याची देखरेख, पॉम्प्लेट, हॅन्डविल यावर प्रकाशक व मुद्रकाचे नाव तपासणे, जाहिराती व पेड न्यूजचा खर्चाचा अहवाल एक्सपेंडिचर ( खर्च ) विभागाला देणे ही प्रमुख कामे माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीचे (एमसीएमसी )असून त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच उमेदवारी निश्चित झाल्‍यानंतर प्रमाणिकरण व संनियंत्रण कार्यामध्‍ये गती देण्‍यात यावी, असे निर्देश यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी दिले.

माध्‍यम प्रमाणिकरण व संनियंत्रण (एमसीएमसी ) समितीचे प्रशिक्षण जिल्‍हाधिकारी कार्यालयात पार पडले. यावेळी प्रशिक्षण व्यवस्थापणाच्या नोडल अधिकारी पद्मश्री बैनाडे, एमसीएमसीचे सदस्य सचिव तथा जिल्‍हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, कुडाळचे तहसिलदार विरसिंग वसावे, सायबर सेलचे प्रमुख उदय झावरे, पोलिस उपनिरिक्षक अनिल व्हटकर, तसेच तालुकास्तरीय मिडीया कक्षाच्‍या सर्व सदस्यांची उपस्थिती यावेळी होती.

भारत निवडणूक आयोगाने राजकीय प्रचाराच्या जाहिरातींबाबत नियमावली निश्चित केलेली आहे. या नियमावलीनुसार राजकीय पक्ष व उमेदवारांनी दूरचित्रवाणी वाहिन्या, केबल नेटवर्क,केबल वृत्तवाहिन्या, सिनेमा हॉल,रेडिओ,सार्वजनिक तसेच खासगी एफएम चॅनेल्स, सार्वजनिक ठिकाणी दाखविण्याच्या दृक-श्राव्य जाहिराती, ई-वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करावयाच्या जाहिराती,बल्क एसएमएस, रेकॉर्ड केलेले व्हॉईस मेसेजेस, सोशल मीडिया, इंटरनेट संकेतस्थळे यावर दर्शविण्याच्या जाहिराती माध्यम प्रमाणिकरण आणि संनियंत्रण समितीकडून (एम.सी.एम.सी.) पूर्व प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक आहे. तसेच मतदानाच्या दिवशी आणि त्याच्या एक दिवस अगोदर वृत्तपत्रात प्रसिद्ध करावयाच्या जाहिराती देखील समितीमडून पूर्व प्रमाणीकरण करुन घेणे आवश्यक असल्याचे श्री तावडे म्हणाले.

प्रशिक्षण व्यवस्थापणाच्या नोडल अधिकारी पद्मश्री बैनाडे यांनी समिती सदस्यांना समितीच्या कार्याविषयी विस्तृत प्रशिक्षण दिले. सारखा मजकूर, एकाच सभेचे सारखे वृत्‍तांकन, उमेदवारांच्‍या विजयी निश्चितीचे दावे, जनतेचे पाठबळ मिळत असल्‍याचे दावे तशा पध्‍दतीचे वाक्‍य वापरुन पेरण्‍यात येणा-या वृत्‍तांची दखल घेण्‍यात यावी. तसेच जाहिरातीच्‍या दरानुसार उमेदवारांच्‍या खर्चामध्‍ये त्‍यांची नोंद करण्‍यात यावी तशी माहिती खर्च विभागाला देण्‍यात यावी असेही त्या म्हणाल्या.

एमसीएमसीचे सदस्य सचिव तथा जिल्‍हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांनी तालुकास्तरावरील समिती सदस्यांनी मिडीया मॉनेटरींग करताना काय खबरदारी घ्यावी तसेच मा. भारत निवडणूक आयोगाच्या अद्यावत मार्गदर्शक निर्देशांची माहिती उपस्थितांना यावेळी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!