काँग्रेस आणि सिल्व्हर ओक सोबत घरोबा करून उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाचा केला गेम

काँग्रेस आणि सिल्व्हर ओक सोबत घरोबा करून उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाचा केला गेम

*कोंकण Express*

*काँग्रेस आणि सिल्व्हर ओक सोबत घरोबा करून उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाचा केला गेम*

*भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांची टीका*

*राज ठाकरेंच्या पाठिंब्यामुळे कलानगरमध्ये बरनॉल चा तुटवडा*

*राज ठाकरेंचा मोदींना पाठिंबा म्हणजे हिंदुत्व भक्कम करण्याला पाठिंबा*

*कणकवली ः प्रतिनिधी*

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. मोदींना पाठिंबा देणे म्हणजे हिंदुत्व भक्कम करणे आहे.यासाठी मी राज ठाकरे यांचे अभिनंदन करतो. राज ठाकरे यांच्या पाठिंब्यानंतर कलानगर मध्ये काल बरनॉल चा तुटवडा पडला असणार अशी टीका भाजपा प्रवक्ते, आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केली.ते कणकवलीत प्रहार भवन येथे पत्रकारांशी बोलत होते.
2019 मध्ये स्वतःचे 18 खासदार निवडून आणण्यासाठी भाजपला पाठिंबा दिला तेव्हा चालले मात्र जेव्हा देश हितासाठी राज ठाकरेंनी पाठिंबा दिला तर पोटशूळ उठला. राज ठाकरेंचा मनसे पक्ष नमो पक्ष झाला म्हणणाऱ्या मातोश्री चा नोकर संजय राऊत याने आता उबाठा पक्ष सिल्व्हर ओक वादी झाला असे म्हणावे काय ? मंगेश पाडगावकर यांच्या कवितेचा आधार घेत शेम शेम म्हणणाऱ्या संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि शरद पवारांशी घरोबा करून हिंदुत्वाचा गेम गेम केला असे म्हणायचे काय ? असा प्रतिसवाल आमदार नितेश राणे यांनी केला. उद्धव ठाकरे हे स्वार्थी असून भाजपा सोबत स्वार्थासाठी गेलो नाही असे म्हणणाऱ्या संजय राऊत याने कलानगर मातोश्री दोन ला परवानगी कशी मिळाली ? याचे उत्तर द्यावे असे आव्हान नितेश राणे यांनी दिले. तर खोक्यांची लूट करणारा सर्वात मोठा लुटारू मातोश्रीच्या तिसऱ्या मजल्यावर राहतो.मातोश्रीच्या खाली जमनित किती खोके आहेत ते टाईल्स कडून संजय राऊत यांनी पहावे.
अरविंद केजरीवाल यांच्या ईडी च्या कारवाई चे हायकोर्ट ने समर्थन केले आहे. त्यामुळे संजय राऊत याने आधी हायकोर्ट स्टेटमेंट वाचावे असा सल्लाही राणे यांनी दिला.एक संपादक असलेला माणूस त्याला पेपर च्या ऑफिसमध्ये करून ठेवण्याच्या लायकीचा नाही.उबाठा हा पूर्ण गांधी मय झाला असून काँग्रेस समोर झुकून झुकून गळ्यात पट्टा बांधावा लागला. आणि शेवटी जसलोक मध्ये जाऊन ऑपरेशन करून घ्यावे लागले असा टोलाही आमदार नितेश राणे यांनी लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!