वैद्यकीय पर्यटन सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक म्हणून सौ संगीता महाडिक

वैद्यकीय पर्यटन सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक म्हणून सौ संगीता महाडिक

*कोंकण Express*

*वैद्यकीय पर्यटन सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक म्हणून सौ संगीता महाडिक*

*विष्णू मोंडकर,अध्यक्ष पर्यटन व्यवसायिक महासंघ*

कोकणाला विस्तीर्ण समुद्रकिनारा तसेच सह्याद्रीच्या उत्तुंग पर्वत राया लाभलेल्या आहेत. तसेच निसर्गाचा संपूर्ण वरदहस्त या संपूर्ण क्षेत्रावर आहे .आज या सर्व क्षेत्रांमध्ये पर्यटन व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे स्थानिकांना रोजगार आणि अर्थप्राप्ती होत आहे. पारंपरिक पर्यटन व्यवसाय बरोबरच जिल्ह्याला वैद्यकीय पर्यटन ची ओळख करून देणे गरजेचे आहे. आज आपल्याकडे अतिशय सुसज्ज अशी हॉस्पिटल ,तज्ञ मार्गदर्शक व आवश्यक असणारी दळणवळणाची सुविधा उपलब्ध आहेत. या सर्व सुविधांचा आणि आपल्याकडे अंगभूत असलेले आदरतिथ्या व सद्यस्थितीत चालू असलेला पर्यटन याची सांगड घातली तर वैद्यकीय पर्यटनाला मोठा वाव सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे.पर्यटन महासंघ जिल्ह्याच्या शाश्वत नियोजनबद्ध पर्यटन विकासासाठी कार्यरत आहेत. वैद्यकीय पर्यटन या क्षेत्रामध्ये पर्यटन महासंघ पुढाकार घेणार असून जिल्ह्याला वैद्यकीय पर्यटन क्षेत्रात एक वेगळी ओळख मिळवून देण्याचा मानस पर्यटन महासंघाचा असून यासाठी वैद्यकीय पर्यटन सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक म्हणून
सौ संगीता महाडिक यांची निवड पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष श्री विष्णू मोंडकर यांजकडून करण्यात आली यावेळी उपसंचालक पर्यटन संचानालय कोकण विभाग ह्याचा उपस्थितीत त्यांची नेमणूक त्यांच्या हस्ते सौ संगीता महाडिक यांचा सत्कार करून जबाबदारी देण्यात आली सौ संगीता महाडिक या आजोळ, ज्येष्ठ नागरिक वैद्यकीय पर्यटन व सेवा केंद्र ,नेरुर, कुडाळ सिंधुदुर्ग च्या संचालक असून त्यांनी पर्यटन महासंघाने दिलेल्या जबाबदारी च्या माध्यमातून जिल्ह्यातील आठही तालुक्यात वैद्यकीय पर्यटन वाढीसाठी आपण काम करणार असल्याचा मानस व्यक्त केला यावेळी श्री विकी तोरसकर श्री मंगेश जावकर श्री अन्वेषा आचरेकर व अन्य पर्यटन व्यावसायिक उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!