*कोंकण Express*
*महायुतीच्या उमेदवाराला विजयी करूया…*
*किरण सामंत यांचे कार्यकर्त्यांना आवाहन खारेपाटण, कासार्डे विभागात मेळावे, बूथ निहाय बैठका…*
* कणकवली ः प्रतिनिधी*
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून जो कोणी महायुतीचा उमेदवार असेल त्याला मोठ्या मताधिक्यानी निवडून आणण्यासाठी महायुतीतील घटक पक्षांच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोमाने काम करावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन सिंधुरत्न समितीचे सदस्य तथा शिवसेना नेते किरण उर्फ भैय्या सामंत यांनी केले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खारेपाटण, कासार्डे जि. प. मतदार संघात मेळावे तर तळेरे, कासार्डे, नांदगाव विभागातील बूथ निहाय बैठका घेण्यात आल्या. यावेळी श्री. सामंत बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमुख संजय आग्रे, कणकवली विधानसभा प्रमुख संदेश सावंत, युवसेनेचे जिल्हाप्रमुख सुकांत वरुणकर, तालुकाप्रमुख शरद वायंगणकर, उपतालुकाप्रमुख मंगेश गुरव, डॉ. प्रदीप धवन, गुरु शिंदे, वाहतूक संघटना संजय नकाशे, जिल्हा कृषी उपन्न समितीचे संचालक मंगेश ब्रह्मदंडे, महिला तालुकाप्रमुख प्रिया टेंबकर, वैभववाडी तालुकाप्रमुख संभाजी रावराणे, कणकवली शहरप्रमुख प्रमोद मसुरकर, मेहुल धुमाळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.