संजय राऊत यांचे खुणाने हात बरबटलेले नसतील तर व्यंकटेश उप्पर जिवंत असल्याचे पुरावे द्यावेत

संजय राऊत यांचे खुणाने हात बरबटलेले नसतील तर व्यंकटेश उप्पर जिवंत असल्याचे पुरावे द्यावेत

*कोंकण Express*

*संजय राऊत यांचे खुणाने हात बरबटलेले नसतील तर व्यंकटेश उप्पर जिवंत असल्याचे पुरावे द्यावेत*

*भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे याचे आव्हान*

*मनसुख हिरेन,सुशांत सिंग राजपूत यांच्याप्रमाणेच व्यंकटेश उप्पर बद्दल घडले असण्याची शक्यता*

*पावसाळी अधिवेशनात उप्पर प्रकरणी आवाज उठविला जाणारच*

*डॉक्टर स्वप्ना पाटकर यांनी प्रतिज्ञापत्रात संजय राऊत यांच्यावर केले आहेत आरोप*

*कणकवली ः प्रतिनिधी*

व्यंकटेश उप्पर हा हेरगिरी करण्यासाठी खासदार संजय राऊत यांनी डॉक्टर स्वप्ना पाटकर यांच्यावर नेमलेला माणूस होता. आठ महिन्याची शिक्षा लागल्यानंतर जामिनावर बाहेर पडून आलेला हा वेंकटेश उप्पर आता बेपत्ता झालेला आहे.सपना पाटकर यांनी या प्रकरणी वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून मनसुख हिरेन, सुशांत सिंग राजपूत यांच्या प्रमाणे व्यंकटेश उप्पर याची हत्या झाली असावी असा संशय व्यक्त केलेला आहे. आणि या प्रकरणात खासदार संजय राजाराम राऊत याचेवर आरोप केला आहे. जर संजय राजाराम राऊत यांचे खुणाने हात बरबटलेले नसतील तर व्यंकटेश उप्पर हा कोठे आहे याचा खुलासा करावा. किंवा उद्या सकाळच्या पत्रकार परिषदेत स्वतःच्या बाजूला बसून व्यंकटेश उप्पर जिवंत असल्याचा पुरावा द्यावा. असे आव्हान भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी दिले.ते कणकवलीत प्रहार भवन येथे पत्रकारांशी बोलत होते.

श्री नितेश राणे म्हणाले,ओसाड गावचे पाटील म्हणजे उद्धव ठाकरे आणि त्यांचे तीन तेरा वाजवणारा भांडुपचा देवानंद संजय राऊत आहे.त्यांची मोदींवर टीका करण्याची लायकी नाही.ज्याच्या कुटुंब व मालक कोविड भ्रष्टाचार आणि खिचडी चोरी प्रकरणात असणारे कधीही जेल मध्ये जाऊ शकतात महाराष्ट्रात केजरीवाल भाग 2 कधीही प्रदर्शित होऊ शकतो.असा इशारा दिला.
मोदींवर एक भ्रष्टाचाराचा आरोप मागील 10 वर्षात हे करू शकले नाहीत. मात्र यांनी कोरोणात भ्रष्टाचार केला.खिचडी खाल्ली,खुणांनी ह्यांचे हात बरबटलेले आहेत. अशी टीका केली.
राणे साहेबांनी सिंधुदुर्ग मध्ये काय दिलं ह्याचा हिशोब हवा असेल तर एका खुल्या व्यासपीठावर या.किती विकास कामे अडविण्याचे काम ह्या विनायक राऊत ने केले आहे. त्याची चर्चा करू असे आव्हान दिले. या विनायक राऊतच्या खडा बैठकांना सात लोक सुद्धा नसतात ही यांची लायकी.

गांधी व उद्धव ठाकरे कुटुंब दुसऱ्यांच्या पैशांवर जगणारे कुटुंब आहेत. ते कोणाच्या पैशाने फिरतात ? त्यांच्या नावे नाही नाही मग गाड्या,बंगले,विमाने कशी येतात. असे लोक मोदी साहेबांचे नाव घेण्याची ह्यांची लायकी नाही.
वैभव नाईक यांचा हा धंदा आहे. त्यांनी राणेंच नाव घेतलं नाही तर मातोश्रीचा पगार मिळणार नाही. कुडाळ मध्ये मिळणारी लीड हे वैभव नाईक यांना उत्तर मिळेल.तर संजय राऊत ने उदय सामंत च्या भावाची चिंता करण्यापेक्षा त्याचा भाऊ नंदनवन मध्ये म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर किती वेळ असतो हे बघावं.तूम्हि नसल्यामुळे आम्ही टेंशन फ्री आहोत. तुमच्या सारखे खुनी बलात्कारी गॅंग रेप चा आरोप असणाऱ्यांनी भाजपावर बोलू नये.असे उत्तर आदित्य ठाकरे यांना आमदार नितेश राणे यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!