*कोंकण Express*
*मुलुख मैदानी तोफ रणरागिणी हरपली*
राज्यमंत्री शेतकरी कामगार पक्षाची मुलुख मैदानी तोफ असणारी मिनाक्षी ताई पाटील हयांचे दि. 29-03-2024 रोजी दु:खद निधन झालेले आहे. हि बातमी ऐकताच माझे मला हेलावुन गेले मान अतीर्व दु:ख झाले. मिनाक्षी ताई पाटील यांचे आणि माझे जिव्हाळयाचे संबंध 19 फेब्रुवारी 1986 पासुन होते त्यावेळी त्या जिल्हा परिषद सदस्य होत्या. आजही मला तो दिवस आठवतो. रायगड जिल्हयातील पोलादपुर तालुक्यामधील अतिदुर्गम भाग म्हणुन ओळखला जाणारा कुडपण या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या स्थायी परिषदेच्या समिती बैठक रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष स्वर्गीय.प्रभाकर पाटील यांनी लावली होती .सदर स्थायी समितीच्या बैठकीत सदस्या या नात्याने मा. मिनाक्षी ताई पाटील यांनी कुडपण आणि पोलादपुर तालुक्यासाठी विकासाचे मुददे अगदी आक्रमकपणे सभेत मांडत होत्या सदरचे मुददे मांडत असताना मी त्याचा आक्रोश अणि आक्रमकपणा जवळुन पहिला.. उपस्थित लोकांच्या अंगावर त्यांची आक्रमक भाषणे ऐकताना शहारे येत होते .मिनाक्षी ताई पाटील यांची जिल्हा परिषद मधील कामगिरी अत्यंत उत्तम झाली म्हणुनच काय त्याची पोहच पावती म्हणुन त्यानंतर अलिबाग विधान सभेच्या त्या आमदार म्हणुन भरघोस मतांनी निवडुन आल्या. मिनाक्षीताई पाटील हया अंत्यंत हुशार अभ्यासु आमदार म्हणुन त्यांचा नाव लैकिक होता. विशेष म्हणजे विधानसभेच्या सभागृहामध्ये त्या त्यांची भुमिका अंत्यंत आग्रहीपणाने व आक्रमणपणे मांडत असत. एक धाडसी नेतृत्व एक धाडसी महिला एक धाडसी आमदार म्हणुन त्यांचा विधानसभेमध्ये सातत्याने नाव लौकिक होत असे रायगड जिल्हयामध्ये जिल्हयाचा विकास होण्याच्या दृष्टिने अंत्यंत त्याचे मोलाच योगदान आहे. मिनाक्षीताई पाटील यांच्याबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली याचे मी परमभाग्य समजतो.
मिनाक्षी ताई पाटील यांची सुन सौ. चित्राताई कुबल- पाटील हया हेाय. सौ.चित्राताई हया मुळच्या वेंगुर्ला जि.सिंधुदुर्ग च्या आहेत. मिनाक्षी ताई पाटील यांनी आपल्या सुनेला जिल्हा परिषद सदस्य म्हणुन निवडुन आणले .तसेच सौ. चित्राताई पाटीन यांना अर्थ व बांधकाम सभापती पद सुध्दा मिळवुन दिले त्या एवढयावरच थांबल्या नाहीतर बांधकाम व अर्थ विभागाचा कारभार गतीमान व पारदर्शक पणे कसा करायचा ,भाषणे कशी करायची अर्थ संकल्पीय भाषण कसे असले पाहिजे जिल्हयांच्या विकासासाठी कोणकोणत्या बाबी अर्थ संकल्पात प्राधान्याने घेतल्या पाहिजे हे अंत्यंत बारकाईने समजुन सांगत असे. सौ. चित्राताई पाटील आणि मिनाक्षी ताई पाटील आम्ही एकत्र जिल्हा दौरे करीत असु चित्राताई ला ते नेहमी म्हणत अजयकुमार सर्वगोड हा जुन्या पिढीतील इंजिनिअर आहे. त्याला माझ्या दादानी (स्वर्गीय प्रभाकर पाटील) नोकरी लावले आहे. हा फार हुशार आणि प्रामाणिक इंजिनिअर आहे. याला बरोबर घेतल्याशिवाय तु जिल्हा परिषदेचा कारभार करत जाऊ नको असे चित्रा ताई पाटील यांना नेहमी सांगत तसेच मला नेहमी सांगत माझी सुन ही माझी भाग्यलक्ष्मी आहे. अजकुमार सर्वगोड तिला बांधकाम व अर्थ याचा कारभार गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी सर्वतोपरी मदत करीत जा असे मला नेहमी सांगत. मी मिनाक्षी ताई पाटील यांनी दिलेल्या सुचनाचे तंतोतंत पालन केले. सौ. चित्राताई पाटील यांना मी आणि श्री. जी.एच.पाटील आम्ही खुप खुप त्याच्या कामात मदत केली. विशेष म्हणजे बांधकाम व अर्थ विभागात चित्राताई पाटील यांची सभापती म्हणुन कामगिरी न भुती न भविष्य अशी झाली याचे सर्व श्रेय आदरनीय मिनाक्षी ताई पाटील यांना जाते.
मला मिनाक्षी ताई पाटील यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली हे माझे मी परम भाग्य समजतो मिनाक्षीताई पाटील त्यांनी मला खुप मुलासारखे प्रेम दिले मला त्यांनी खुप आधार दिला.त्याच्या जाण्याने मला अतिशय दु:ख झाले आहे. मिनाक्षीताई पाटील यांच्या जाण्याने संबंध रायगड जिल्हयाचे अतोनात नुकसान झाले आहे. ताईची विधानसभेतील आमदार म्हणुन, राज्यमंत्री म्हणुन कारकीर्द वाखण्यासारखी आहे. त्यांनी जिल्हा परिषद सदस्य आमदार राज्यमंत्री अत्यंत महत्वाची चोख कामगिरी बजावली .त्यांनी त्याचा कार्याचा अलौकिक कामाचा ठसा सुध्दा उमटवला आहे. त्यांच्या जाण्याने प्रचंड पोकळी निर्माण झाली आहे. मिनाक्षी ताई पाटील यांच्या कार्याला लाख लाख सलाम. त्याच्या कार्याला, विचाराला अणि प्रेरणादायी स्मृतीला माझी भावपुर्ण श्रंध्दाजली व आदरांजली …