जेष्ठ पत्रकार दयानंद मांगले यांना ग्लोबल लीडरशिप राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करून सन्मानचिन्ह,मानपत्र देऊन गौरविण्यात आले

जेष्ठ पत्रकार दयानंद मांगले यांना ग्लोबल लीडरशिप राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करून सन्मानचिन्ह,मानपत्र देऊन गौरविण्यात आले

*कोंकण Express*

*जेष्ठ पत्रकार दयानंद मांगले यांना ग्लोबल लीडरशिप राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करून सन्मानचिन्ह,मानपत्र देऊन गौरविण्यात आले*

*देवगड ः प्रतिनिधी*

तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या इंटरनॅशनल ह्युमन राईट्स अंबेसिडर ऑर्गनायझेशन या संघटनेच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पाच पदाधिकारी सदस्यांचा ग्लोबल लिडरशिप अवॉर्ड २०२४ पुणे विमान नगर येथील शेरेटन पॉईंट्स ४ हॉटेल येथे संपन्न झालेल्या दादासाहेब फाळकेइंटरनॅशनल सिने अकॅडमी अवॉर्ड २०२४ सोहळ्यात सिने अभिनेते दीपक शिर्के,आरती शिंदे,सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई पार्श्व गायिका राजेश्वरी पवार ऑर्गनाझर प्रेसिडेंट डॉ अविनाश साकुंडे,इंटरनॅशनल ह्युमन राईट्स संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष अफसर कुरेशी महिला राष्ट्रीय अध्यक्षा सौ.प्रविणा कडू यांच्या तसेच अन्य मराठी सेलिब्रेटी यांच्या उपस्थितीत ग्लोबल लीडरशिप राज्यस्तरीय सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार देऊन पुणे येथे विशेष सन्मान शनिवारी पार पडलेल्या सोहळ्यात गौरव करण्यात आला.या सोहळ्यात मराठी सिनेसृष्टीत अभिनय,संगीत,नृत्य,अन्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मानचिन्ह,मानपत्र,सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यात जेष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते मीडिया प्रेसिडेंट दयानंद मांगले,सेवानिवृत्त सहा. पोलीस निरीक्षक तथा पोलीस संरक्षण कायदा तालुका अध्यक्ष विजय कदम,(देवगड)जिल्हा उपाध्यक्ष दयानंद तेली,(हिंदळे)नूतन तालुका अध्यक्ष श्याम कदम,(मिठबाव)महिला तालुका अध्यक्ष सौ.दीक्षा तेली(हिंदळे)यांचा समावेश आहे.
पुणे येथे पार पडलेल्या दादासाहेब फाळके सिने अकादमी अवॉर्ड २०२४ वितरण सोहळ्यात सिनेसृष्टीत महत्वपूर्ण सेवा, कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मानचिन्ह,मानपत्र देऊन गौरव तसेच ग्लोबल लीडर शिप अवॉर्ड २०२४ मान्यवर सेलिब्रेटीच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले.या सोहळ्यास हिंदी चित्रपट सृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री यांची विशेष उपस्थिती होती.त्यांच्या हस्तेही प्रमुख अवॉर्ड प्रदान करण्यात आले.त्यांचाही विशेष गौरव करण्यात आला इ
इंटरनॅशनल ह्युमन राईट्स संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अफसर कुरेशी,महिला राष्ट्रीय प्रमुख प्रविणा कडू व अन्य पदाधिकारी यांनी ग्लोबल लीडर शिप अवॉर्ड विजेत्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.
फोटो-१)सामाजिक कार्यकर्ते पत्रकार दयानंद मांगले यांचा सन्मान करताना डॉ अविनाश साकुंडे ,सिने अभिनेते दीपक शिर्के,सामाजिक नेत्या तृप्ती देसाई व अन्य
२) इंटरनॅशनल ह्युमन राईट्स देवगडचे ग्लोबल लीडर शिप अवॉर्ड विजेते पदाधिकारी व मान्यवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!