निगुडे देवळीवाडी विहिरीपर्यंत रस्ता जनसुविधा अंतर्गत मंजूर असून सदर रस्त्याचे काम अद्याप सुरू नाही

निगुडे देवळीवाडी विहिरीपर्यंत रस्ता जनसुविधा अंतर्गत मंजूर असून सदर रस्त्याचे काम अद्याप सुरू नाही

*कोंकण Express*

*निगुडे देवळीवाडी विहिरीपर्यंत रस्ता जनसुविधा अंतर्गत मंजूर असून सदर रस्त्याचे काम अद्याप सुरू नाही*

*रस्त्याचे मजबुतीकरण न झाल्यास 11 मार्च रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार*

*गुरुदास निगुडकर व ग्रामस्थ यांचा गटविकास अधिकाऱ्यांना इशारा*

*निगुडे देवळीवाडी विहिरीपर्यंत रस्ता मजबुतीकरण करणे काम जिल्हा वार्षिक योजना सन २०२२/२०२३ जनसुविधा अंतर्गत मंजूर असून सदर रस्त्याचे काम अद्याप सुरू नसून दिनांक ८ मार्च २०२४ पूर्वी सुरू न झाल्यास उद्या ११ मार्च २०२४ रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर सावंतवाडी येथे बेमुदत उपोषण करणार गुरुदास निगुडकर व ग्रामस्थ यांचा गटविकास अधिकाऱ्यांना इशारा*

बांदा प्रतिनिधी: निगुडे देवळीवाडी विहिरीपर्यंत रस्ता मजबुतीकरण करणे काम जिल्हा वार्षिक योजना सन २२/२३ जनसुविधा अंतर्गत मंजूर असून सदर रस्त्याचे काम ठेकेदाराकडून अद्याप पर्यंत चालू करण्यात आलेले नाही. सदर रस्ता वाहतुकीस पूर्णपणे अयोग्य आहे त्यामुळे वाडीतील गरोदर महिला, वयोवृद्ध नागरीक, शाळकरी मुले, यांना रस्त्यावरून प्रवास करत असताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सदरचा निधी खर्च करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०२४ पर्यंत असून मुदतीत निधी खर्च न झाल्यास तो निधी परतून जाण्याची शक्यता आहे. रस्त्याचे काम सुरू करण्याबाबत निगुडे सरपंच यांना अनेकदा विचारले असता त्यांच्याकडून काम सुरू करणेबाबत कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. तरी सदरचे काम दिनांक ८ मार्च २०२४ पूर्वी सुरू न झाल्यास व त्याची योग्य ती दखल न घेतल्यास सोमवार दिनांक ११ मार्च २०२४ रोजी सकाळी १०:०० वा. मी माझ्या वाडीतील सर्व ग्रामस्थ, मित्रपरिवार सोबत पंचायत समिती सावंतवाडी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार आहे. कायदा सुव्यवस्था बिघडल्यास त्यास प्रशासन जबाबदारी राहील असा इशारा निगुडे देवळीवाडीतील ग्रामस्थ गुरुदास निगुडकर यांनी दिला आहे. दिनांक १० मार्च २०२३ रोजी निगुडे सरपंच यांनी देवळीवाडी ग्रामस्थांची बैठक लावली होती परंतु ती निष्फळ ठरली उद्या सकाळी ठिक १०:०० गटविकस अधिकारी पंचायत समिती समोर सावंतवाडी याठिकाणी उपोषणास बसणार आहोत या विषयी आम्ही ठाम आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!