*कोंकण Express*
*फोंडाघाट मधील ट्रक- लाकूड व्यावसायिक सुभाष राणे यांचे दुःखद निधन !*
*फोंडाघाट ः प्रतिनिधी*
फोंडाघाट- पिंपळवाडी येथील ट्रक- लाकूड व्यावसायिक सुभाष राजाराम राणे (७३ वर्षे) यांचे त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने शनिवारी दुःखद निधन झाले. त्यांचे मूळ गाव घोणसरी असून व्यवसाय निमित्त ते येथे स्थायिक झाले होते. वृद्धापकाळा मुळे त्यांनी आपल्या व्यवसायातून निवृत्ती घेतली होती. दोन दिवसापूर्वी कोल्हापूर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये औषधोपचार घेऊन, ते घरी परतले होते. परोपकार आणि अध्यात्मिक संप्रदायाची यांना आवड होती.
त्यांचे पश्चात पत्नी, तीन मुलगे, तीन मुली,सुना- जावई-नातवंडे असा मोठा परिवार आहे. पंचायत समिती, ओरस मधील प्रभाक,र प्रतीथयश ट्रक- लाकूड व्यावसायिक राजेंद्र आणि गणेश यांचे ते पिताश्री होत. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे पंचक्रोशीत दुःख व्यक्त होत आहे…