*कोकण Express “
*ग्रामीण स्त्रियांचे आरोग्य काल, आज आणि उद्या .-प्रा. पी.जी. कांबळे*
*”राष्ट्रीय महीला दिन विशेष”*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*
सर्व खेडी आधुनिक होत चालली आहेत . नवनविन तंत्रज्ञान खेड्यापर्यंत पोहचले आहे . खेड्यांची पारंपरिकता आज संपुष्टात येत चालली आहे . जुणे सणवार सुद्धा आधुनिक होत आहेत खेड्यातील निसर्ग ही आधुनिक शेती तंत्रामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे खेड्यातील घरांची रचनाही बदलली सिमेंट कॉक्रेट ची घरे खेड्यात मोठ्याप्रमाणात व्यापली आहेत पूर्वीची मातीची दगडांची पालापाचोळा असलेली घरं आता खेड्यात् क्वचित पहायला मिळतात . दळणवळण मोठ्याप्रमाणात खेड्यात पोहचले आहे प्रत्येत घरात दुचाकी चारचाकी गाड्यांचे पेव फुटले आहे . दुध व्यवसायाने खेड्यांची भरभराट झालेली आहे . पूर्वीचा कष्टाळू शेतकरी काळ्या आईची सेवा करत रान धरून शेतात पडून असायचा मुबलक शेतीचा बारदाना होता . गायीगुरं शेळ्यामेंढ्या . बैलजोडी . म्हसरं यांनी घरचा गोटा भरून वहायचा . मातीवर जीवापाड प्रेम असणारा कुणबी मुक्या जनावारावरही तितकचं त्याच प्रेम ओसंडून जायचं . घर आणि शेतीचे कष्ट सोसणारी घरधनीन मात्र खेड्यात पराधिन होऊन जायची खेडून स्त्रियांचे सगळं आयुष्य कष्टात जात होत आजही काळ बदलला तरी खेडूत बाईचं जीणं तेच आहे . त्यामुळे ग्रामीण स्त्रिया आपल्या आरोग्याकडे फारशा लक्ष देत नाहीत असेच चित्र आजही दिसते . आरोग्याच्या सर्व सोयी आज खेड्यात पोहचलेल्या दिसत नाहीत . तरीही कामाच्या धबड घाईत स्त्रियांच्या खाण्यापिण्याच्या वेळा नेहमी चुकत आहेत . भल्या पहाटे उटून घरचा गोटा आवरणे दुधाच्या धारा काढणे . घरचे जेवण रांधणे पोराबाळांची व्यवस्था पहाणे धावत पळत शेतीच्या कामात मदत करणे या सर्व व्यापात जेवण वेळेवर स्त्रिया घेत नाहीत ग्रामीण भागात सर्व काही शेतीत पिकत असते त्याचा वेळेवर आरोग्य सांभाळण्यासाठी उपयोग करून घेतला पाहिजे . आज फास्ट फूड अन्न खेड्यातही पोहचले आहे बेकरीचे पदार्थ मोठ्या प्रमाणात खेडूत घरापर्यंत जात आहेत . मांसाहार अतिरिक्त वाढला आहे त्यामुळे स्रियांच्या आरोग्याच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत . आर्थिक संकट त्याची चिंता अपूरी झोप . अस्वच्छता ‘ केसांची समस्या ‘ त्वच्या रोग ‘ दातांची समस्या ‘ कॅल्शिअमचा अभाव त्यामुळे मानेची हाडे ‘कमरेची समस्या ‘ गुडघे दुखी संधीवात ‘ मुत्ररोग ‘ यामुळे स्त्रीयांचे आरोग्य बिघडत चालले आहे यासाठी दररोज सकाळाची न्याहरी ज्वारी बाजरी नाचणी ची भाकरी हिरव्या पालेभाज्या ‘ योग्य अशी कडधान्य यांचा वापर खेडूत स्त्रियांनी मोठ्या प्रमाणात केला तरच शरिराला योग्य प्रकारचे जीवन सत्व मिळतील . घरातील स्रीचे आरोग्य उत्तम असेल तरच संपूर्ण घर आनंदित राहील म्हणून ग्रामीण भगिनीनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी जीवन सुंदर आहे आणखीन मौल्यवान बनविण्याचा प्रयत्न करा उद्या