*कोंकण Express*
*गोव्याहुन मालवणला जाणारी गोवा बनावटी दारू इन्सुली चेकनाक्यावर ८० लाखांची दारू पकडली..*
*बांदा प्रतिनिधी*
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सुर्यवंशी संचालक प्रसाद सुर्वेअधीक्षक मनोज शेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली इन्सुली चेक नाका येथे वहानानची तपासणी करत असताना केए. 37- ए-2839 या दहाचीचाकी ट्रकची झडती घेतली. गाडीमध्ये गोवा बनावटीची वेगवेगळ्या प्रकारची दारू सापडून आली.चोरट्या वहातुकीवर कारवाई करून 12 लाख किंमतीचा दहाचाकी ट्रक,79लाख 20 हजार रूपये किमंतीची दारू मीळुन 91लाख 20 हजार रूपयांच्या मुद्देमालासह मालवण मळावाडी येथील अरूण लक्ष्मण मीठबावकर वय वर्षे 48 या संशयीत युवकाला ताब्यात घेतले.सदरची कारवाई निरिक्षक संजय मोहिते,दु. निरिक्षक तानाजी पाटील, दु. निरिक्षक प्रदिप रास्कर, सहा.दु. निरिक्षक गोपाळ राणे, जवान दिपक वायदंडे यांनी केली. अधीक तपास संजय मोहिते करत आहेत.