पावशी गावातील सत्ताधारी शिवसेनच्या सरपंचांचे ते लाक्षणिक उपोषण म्हणजे एक नौटंकीच

पावशी गावातील सत्ताधारी शिवसेनच्या सरपंचांचे ते लाक्षणिक उपोषण म्हणजे एक नौटंकीच

*कोकण Express*

*पावशी गावातील सत्ताधारी शिवसेनच्या सरपंचांचे ते लाक्षणिक उपोषण म्हणजे एक नौटंकीच*

*पावशी ग्रामपंचायत सदस्य वृणाल कुंभार यांनी लगावला टोला*

*कुडाळ ः प्रतिनिधी*

काल प्रजासत्ताक दिनी पावशी गावचे सरपंच यांनी हायवे ठेकेदार आणि हायवे प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केलं होतं ,सदर उपोषणात सहभागी झालेले सर्वच शिवसैनिक पदाधिकारी होते.गेली 6 वर्ष सत्ताधारी शिवसेना पक्ष पावशी गावातील सामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी अपयशी ठरला हे या उपोषणातून दिसून येत आहे.सरपंच महोदयांनी पावशी गावातील कामे पूर्ण होण्यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हाचे मान खासदार विनायक राऊत यांच्याकडे पण वारंवार मागणी केली होती तसेच कुडाळ मालवणचे मान आमदार वैभव नाईक यांच्याकडे पण मागणी केली होती परंतु सदर मागणीकडे त्यांनी दुर्लक्ष केला,खासदारांनी तर पावशी गावात भंगसाळ नदीकडे काही दिवसांपूर्वी पाहणी दौरा पण केला होता तरीपण हायवे संदर्भातील कामे अपूर्णच राहिली आहेत, यावरूनच आमदार खासदार यांची अकार्यक्षमता यातून दिसून येते , आपली कामे ह्या दोन्ही नेत्यांनी पूर्ण न केल्यामुळे सरपंचांचा आपल्या नेत्यांवर विश्वास राहिला नाही म्हणून त्यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला अस ते लोकांच्या उपोषणकरून निदर्शनास आणून देण्याचा आणि ह्यातून आपली बाजू मारून नेण्याचा प्रयत्न करतायेत ,पण खर तर ही नौटंकी आहे, कारण आज आमदार खासदार तसेच पालकमंत्री यांच्याच पक्षाचे असताना पण हायवे संदर्भातील कामे पूर्ण होऊ शकत नसल्याने उपोषण करून ग्रामस्थांची दिशाभूल करतायेत , परंतु यापूर्वीचे माजी सरपंच श्रीपाद तवटे यांनी पावशी गावातील हायवे संदर्भातील कामांसंदर्भात मान खासदार नारायणराव राणे साहेब ,मान आमदार नितेशजी राणे साहेब,जी प गटनेते मान रणजितजी देसाई साहेब यांच लक्ष वेधून त्यांच्या माध्यमातून कामे पूर्ण करून घेण्यासाठी यापूर्वीच पाठपुरावा केला आहे ,बस थांबे असतील किंवा घावणळा फाटा यासारखे बरेच प्रश्न लवकरात लवकर पूर्ण होतील आणि काम झाल्यावर त्याचे श्रेय श्रीपाद तवटे याना मिळेल म्हणून हे उपोषण करून नौटंकी करत आहेत , ग्रामपंचायतजवळचा बस थांबा स्वतःच्या घरासमोर होत असताना सरपंच साहेब झोपले होते का ? असाही प्रश्न वृणाल कुंभार यांनी यावेळी उपस्थित केला, तसेच यांच्या आमदार खासदारांना काहीच कांम करायला जमत नाही आहे हे त्यांच्याच पक्षाच्या सरपंच आणि कार्यकर्त्यांनी उपोषण करून जनतेसमोर दाखवून दिलं आहे असा टोला पावशी ग्रामपंचायत सदस्य वृणाल कुंभार यांनी लगावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!