*कोंकण Express*
*जिल्हा स्तरीय चित्रकला स्पर्धेमध्ये विद्यामंदीर हायस्कूलने केली पदकांची लयलूट.*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन यांच्यामार्फत अतिशय भव्य दिव्य अशी जिल्हास्तरीय निबंध, वक्तृत्व व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सदर स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील प्रथम फेरीत शाळा स्तरावर हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शविला होता त्यातून तालुका पातळीवर चित्रांची निवड होऊन प्रत्येक तालुक्यातून गटवाईज तीन चित्रे अशी 24 चित्रे जिल्हास्तरावर पोचलेली होती. गट पाचवी ते सातवी व गट आठवी ते दहावी या दोन्ही गटातून जिल्हास्तरीय अंतिम निवड प्रक्रियेमध्ये विद्यामंदिर हायस्कूल कणकवली प्रशालेतील तीन विद्यार्थी यशस्वी झाले असून जिल्ह्याचे पालकमंत्री मान .नाम.रवींद्रजी चव्हाण साहेब यांचे हस्ते व अन्य पदाधिकारी मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये या विद्यार्थ्यांचा रोख रक्कम ,ट्रॉफी ,प्रमाणपत्र ,शाल व श्रीफळ देऊन भव्यदिव्य असा सन्मान करण्यात आला.
गट ५ वी ते ७वी – मोहित सुतार -द्वितीय क्रमांक रोख रक्कम – ११०००/- ट्रॉफी व प्रमाणपत्र,
गट -८ वी ते १० वी – प्रथम क्रमांक – निशांत राणे – रोख रक्कम रु.२१०००/-, ट्रॉफी ,प्रमाणपत्र, शाल व श्रीफळ.
तृतीय क्रमांक- निधी केदारी- रू. ५५००/- ट्रॉफी प्रमाणपत्र ,शाल व श्रीफळ