*कोकण Express*
*जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक यांची वर्णी*
*सिंधुदुर्ग*
जिल्हा नियोजन समितीच्या ‘विशेष निमंत्रित सदस्य’ पदी यादीत शिवसेना,राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षातील महत्त्वाच्या व्यक्तिंचा यात समावेश केला आहे.
जिल्हा नियोजनाचा अनुभव असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९ सदस्यांची सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्य म्हणून शासनाने आज नियुक्ती केली आहे. जिल्हा नियोजन समिती मध्ये जिल्हा नियोजनाचा अनुभव असलेल्या व्यक्तींची ‘विशेष निमंत्रित’ सदस्य म्हणून नियुक्ती करण्याची तरतूद आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्य म्हणुन जिल्ह्यातील ९ सदस्यांची नियुक्ती केली आहे.
आज त्या ९ सदस्यांच्या नियुक्तीचा शासन निर्णय जारी करण्यात आला.यामध्ये राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक आणि बाळ कनयाळकर यांची राष्ट्रवादीच्या कोट्यातून निवड झाली आहे.