पावशी शाक्यनगर येथील समाज मंदिराचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते झाले उदघाटन

पावशी शाक्यनगर येथील समाज मंदिराचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते झाले उदघाटन

*कोंकण Express*

*पावशी शाक्यनगर येथील समाज मंदिराचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते झाले उदघाटन*

*आ. वैभव नाईक यांनी आमदार फंडातून दिला ९ लाख रु. निधी*

आमदार वैभव नाईक यांच्या आमदार फंडातून ९ लाख रु खर्चून पावशी शाक्यनगर येथे समाज मंदिर उभारण्यात आले आहे. या समाज मंदिराचा उदघाटन सोहळा काल आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. समाज मंदिर उभारण्याची ग्रामस्थांची मागणी पूर्ण केल्याबद्दल आ. वैभव नाईक यांचे ग्रामस्थांनी आभार मानले.

आ. वैभव नाईक म्हणाले, समाज मंदिराच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम घेऊन ग्रामस्थांनी त्याचा चांगला उपयोग करून घ्यावा. समाज मंदिराची देखभाल ठेवावी. ग्रामस्थांना आवश्यक असलेली इतर विकास कामे देखील यापुढच्या काळात मार्गी लावली जातील. येथील ग्रामस्थांनी ज्याप्रमाणे शिवसेनेला साथ दिली आहे. तशीच साथ पुढील निवडणुकांमधेही द्यावी असे आवाहन आ. वैभव नाईक यांनी केले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, विभागप्रमुख दीपक आंगणे,उपसरपंच लक्ष्मीकांत तेली, युवासेना उपतालुकाप्रमुख सागर भोगटे,शाखा प्रमुख किशोर तवटे,माजी सरपंच चंद्रकांत कुंभार, ग्रा. प. सदस्य वसंत भोगटे, गणेश पावसकर, निकिता शेलटे,दिव्या दळवी,दिव्या खोत, चित्रा पावसकर, पिंकी तेली,बाबा पावसकर,शेखर पोखारे,अमोल पावसकर,दादा खोत,नवजीवन विकास मंडळ पावशीचे अध्यक्ष सहदेव पावसकर,सचिव चंद्रकांत पावसकर,खजिनदार अनिल पावसकर, उपखजिनदार अनिकेत पावसकर,सदस्य शुभम पावसकर ,निशा पावसकर, दिगंबर पावसकर आदी पावशी ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!