*कोंकण Express*
*माऊली मित्र मंडळ, जुना भाजी मार्केट व्यापारी मित्र मंडळ यांच्या सालाबाद प्रमाणे सत्यनारायणाच्या महापूजेच्या निमित्ताने आ नितेश राणे यांचा शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन केला सन्मान*
काल दिनांक २०/०१/२०२४ रोजी माऊली मित्र मंडळ, जुना भाजी मार्केट व्यापारी मित्र मंडळ व संलग्न मित्र मंडळाचे वतीने लोकप्रिय आमदार श्री नितेश जी राणे साहेब यांना शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले,
*माऊली मित्र मंडळ, जुना भाजी मार्केट व्यापारी मित्र मंडळ, व संलग्न मित्र मंडळाचे वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी “श्री सत्यनारायणाच्या महापूजेचे ” आयोजन करण्यात आले होते,
*याप्रसंगी आमदार श्री नितेश जी राणे साहेब यांनी श्री सत्यनारायणाच्या महापूजेचे दर्शन निमित्ताने व्यापारी मार्केट ला भेट दिली, यावेळी संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी शाल, श्रीफळ ,पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले,
*यावेळी व्यापारी मित्र मंडळाचे अनिल मेस्त्री, महेश मेस्त्री, संतोष महाजन, रंगाराव पवार, विशाल रजपूत, हेमंत नाडकर्णी, जमिल कुरैशी ,लवु जैताळकर, म्हापसेकर, निखार्गे, सौ मेस्त्री, सौ फाटक, आदी व्यापारी बंधू भगिनी उपस्थित होते,
*यावेळी आमदार साहेबांनी असे प्रतिपादन केले की, या व्यापारी संकुलनाचे बांधकाम करण्याच्यादृष्टीने ज्या काही आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करणे आहे, त्या दृष्टीने तसेच बांधकाम काम चालू केले नंतर लवकरात लवकर ते कसे पुर्ण करून ,माझ्या या तमाम व्यापारी बांधवांना आप आपले व्यवसाय करण्यासाठी त्यांच्याकडे सुपूर्द करता येतील, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत,
*यावेळी सर्व मंडळाचे वतीने कलमठ गावचे सरपंच श्री संदीप मेस्त्री , सामाजिक कार्यकर्त्या सौ सुप्रिया पाटील, सामाजिक कार्यकर्ते अण्णा होते, आणि कलमठ चे सामाजिक कार्यकर्ते मिलिंद मेस्त्री यांचा आमदार साहेबांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.