*कोंकण Express*
*अयोध्या मधील प्रभू श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळ्या दिवशी कणकवली मतदारसंघात भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन*
*छत्रपती शिवाजी महाराज चौकात सायंकाळी ७.०० वा. आमदार नितेश राणे यांच्या हस्ते महाआरतीचे आयोजन*
*अयोध्यात गेलेल्या कार सेवकांचा आ नितेश राणेंच्या हस्ते जाहीर सत्कार*
*कणकवली ः संजना हळदिवे*
दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या हस्ते पार पडत आहे. सदरहू कार्यक्रमाच्या निमित्ताने देशभर अनेक धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन केले जात आहे. त्यानुसार कणकवली, देवगड, वैभववाडी मतदारसंघाचे आमदार श्री. नितेशजी राणे साहेब यांच्या हस्ते कणकवली मध्ये श्री शिवाजी महाराज चौकात सायंकाळी ७.०० वाजता महाआरती करण्यात येणार असून त्यानंतर 1992 साली कार सेवक म्हणून अयोध्येला गेलेल्या मतदारसंघातील मान्यवरांचा सत्कार सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर रात्रौ ९.०० वाजता प्रभू श्रीरामाच्या रामलीलांचे दशावतारी नाट्य सादर करण्यात येणार आहे.