शिक्षिका शितल परब यांचा आंतरराष्ट्रीय एक्सलन्स पुरस्काराने सन्मान

शिक्षिका शितल परब यांचा आंतरराष्ट्रीय एक्सलन्स पुरस्काराने सन्मान

*कोंकण Express*

*शिक्षिका शितल परब यांचा आंतरराष्ट्रीय एक्सलन्स पुरस्काराने सन्मान…*

*कणकवली ः प्रतिनिधी*

अखिल भारतीय दर्पणकर बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्यावतीने पत्रकार दिनानिमित्त शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक अशा विविध क्षेत्रात अविरतपणे उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल भारतीय जैन संघटनेच्या शाळेतील माध्यमिक शिक्षिका शितल चव्हाण – परब यांना माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आशिये गावच्या कन्या आहेत.

पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आंतरराष्ट्रीय एक्सलन्स अवॉर्ड पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पत्रकारिता तसेच इतर विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या कर्तुत्ववान महिला व पुरुषांचा सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी माजी खासदार रामशेठ ठाकूर, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष महेंद्र देशपांडे,भारतीय पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील सोनवणे,मिसेस इंडिया डॉ. शुभदा जगदाळे, अलबत्या गलबत्या नाटकात चेटकिणीची भूमिका करणारे प्रसिद्ध अभिनेते निलेश गोपनारायण, संपादक निलेश खरे आदी मान्यवर उपस्थित होते.

शिक्षिका शितल चव्हाण – परब या लेखिका असून त्यांनी विविध विषयांवर साहित्य लेखन केलं आहे.त्यांचे सासर हे कुडाळ येथे परब कुटुंबीय असून त्याचे माहेर आशिये येथे आहे.त्या लहान असताना वडील नोकरी निमित्त पुण्याला स्थायिक झाले. मात्र,शिक्षिका शितल चव्हाण – परब शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केलं आहे. त्यामुळे त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!