*कोंकण Express*
*ऑनलाईन जुगारावर कठोर कारवाई करा…*
*परशुराम उपरकर पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन.*
*सिंधुदुर्गनगरी*
जिल्ह्यात राजरोस सुरु असलेल्या ऑनलाईन लॉटरी (जुगार), अवैद्य धंदे व अमली पदार्थाच्या विक्रिबाबत कठोर कारवाई करावी. याकडे जिल्हा पोलिस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधले आहेत. योग्य कारवाई न झाल्यास जनतेला सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडणार असल्याची माहिती माजी आमदार तथा मनसे राज्य सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेला ऑनलाइन जुगार, अमली पदार्थ विक्री यासह अवैध धंद्यावर आळा बसावा. यासाठी आज जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांचे निवेदनाद्वारे परशुराम उपरकर यांनी लक्ष वेधले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अमली पदार्थाचे मोठे रॅकेट निर्माण झालेले आहे. महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचे साठे पकडल्याचे प्रसिद्ध झालेले आहे. याबाबत आपल्या पोलिस विभागामार्फत काही कार्यवाही केसेस सिंधुदुर्गात दाखल झालेल्या आहेत. त्या अमली पदार्थाच्या मुळाशी जाऊन अमली पदार्थ जिल्ह्यात सप्लाय करणारा कोण, जिल्ह्यात येणारा अमली पदार्थ गोवा, कर्नाटक, मुंबई, कोल्हापूर या कोणत्या भागातून आणले जातात. त्याच्या मुळाशी पोलिस यंत्रणा कसुन तपासणी करत नाही व मुळापर्यंत जात नाही. त्यामुळे पकडलेले आरोपी सहजरित्या जामिनावर सुटुन परत त्याच व्यवसायाकडे वळतात. अमली पदार्थ पुरवठा व विक्रि करणाऱ्या व्यवसायात बेरोजगार तरूण तरूणींचा वापर केला जातो. सध्या अमली पदार्थ जिल्ह्यात गावांपर्यंत येऊ लागल्याने अनेक ठिकाणी शहरात मुले, मुली कॉलेजमध्ये शिकणारे तरूण व्यवसनाच्या आहारी जात आहेत आणि त्यामुळेच या अमली पदार्थ व्यवसनामुळे चोन्या व विविध गुन्हे करत आहेत. काही ठिकाणी तरूण आत्महत्या करू लागलेले आहेत. या अमली पदार्थाचे विक्रि करण्याकरीता पोलिस यंत्रणेकडून कडक कारवाई करण्यात यावी. व जिल्ह्यातील व्यसनाच्या आहारी जाणारे तरूण तरूणी यांना वाचवावे. अशी आमची मागणी आहे.
याचप्रकारे जिल्ह्यात ऑनलाईन लॉटरी, ऑनलाईन झुगार मोठ्या प्रमाणात चालू आहे. त्याचे केंद्रस्थान कणकवलीतून आहे. त्या केंद्रस्थानार्फत ४० ते ६५ कॉम्प्युटर सेंटर किंवा लॅपटॉपद्वारे सुरू केलेली आहेत. या सेंटरमध्ये काही खेळ २८ टक्के जी.एस.टी. खेळून
खेळले असे दाखवले जाते. प्रत्यक्षात २८ टक्के जी.एस.टी चा खेळ ५ ते १० टक्के खेळला जातो. असे दाखवले जाते, पण प्रत्यक्ष ९० टक्के जुगार कोणताही जी.एस.टी. व कोणताही कर न भरता निव्वळ झुगार खेळला जातो. ऑनलाईन खेळावरती जिल्ह्यामध्ये सुमारे एक ते दीड कोटीचे उत्पन्न दिवसाला होत असल्याचे समजते. सदर खेळामध्ये खेळण्याकरीता तरूण तरूणी ग्रामस्थ व नागरीकांना उदार ऑनलाईन पैसे दिले जातात. व त्यावरती ऑनलाईन झुगार खेळला जातो. आणि त्यामुळे असे सहजरित्या जुगारांना मिळणाऱ्या पैशावरती तरूण झुगार खेळत आहे. बहुतांशी तरूणांचा अंगावर उधार घेतलेले २, लाख ते १० लाख रूपयांपेक्षाही जास्त पैसे घेऊन खेळवले जात आहे. ती उदारी वसुली करण्याकरीता तरूणांच्या अंगावरती दागिणे, गाडया किंवा वस्तू जबरदस्तरने घेतल्या जात आहेत. त्यामुळे काही कुटुंबातील पालकांना भुर्दड भरावाही लागलेला आहे. याकरीता ऑनलाईन नियमबाह्य झुगार बंद करावा. जनतेमध्ये त्या ऑनलाईन झुगारासाठी प्रत्येक पोलिस स्टेशन बीटला ऑनलाईन झुगाराचे हप्ते दिले जातात. अशा चर्चा आहेत. त्यामुळे झुगारांचे पोलिस यंत्रणा कारवाई करत नसल्याने जनतेमध्ये अशी चर्चा सुरू झालेली आहे. सर्व पोलिस यंत्रणेला ऑनलाईन जुगारांची ठिकाणे व अमली पदार्थ विकणाऱ्यांची नावे व अमली पदार्थ मिळण्याची ठिकाणे माहिती आहेत. मात्र कारवाई होत नाही. ऑनलाईन झुगार, अमली पदार्थ विक्री त्यामुळे तरूण पिढी आहारी जात आहे. त्यावरती पोलिस यंत्रणेद्वारे आपण कडक कारवाई करावी.
तसेच अशा प्रकारच्या ऑनलाईन झुगारावरती कोल्हापूर जिल्ह्यातील पोलिसांनी सर्व साहित्य जप्त करून महाराष्ट्र झुगार प्रतिबंधक अधिनियमन १८८७ अंतर्गत कारवाई
केलेली आहे. त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या संगणकाद्वारे झुगार चालवण्याचा सर्व केंद्रे पोलिस यंत्रणेला माहिती आहेत, त्यावर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली आहे. याचे गांभीर्य ओळखून कारवाई न झाल्यास जनते समवेत जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल. असे यावेळी बोलताना उपरकर यांनी स्पस्ट केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ता प्रसाद गावडे उपस्तित होते.