शिरवल मुख्य रस्त्याचे काम त्वरित सुरू करा ; अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार

शिरवल मुख्य रस्त्याचे काम त्वरित सुरू करा ; अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार

*कोंकण Express*

*शिरवल मुख्य रस्त्याचे काम त्वरित सुरू करा ; अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार*

*शिरवल उपसरपंच प्रविण तांबे यांचे पीएमजीएसवाय उपअभियंता सुतार यांना निवेदन*

*आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या उपस्थितीत दिले निवेदन*

*कणकवली ः प्रतिनिधी* 

*कणकवली शिरवल कळसुली मार्गावरील शिरवल गावचा जोडरस्ता ग्रामीण मार्ग क्रमांक 393 या शिरवल गावातील मुख्य रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मंजूर आहे. शिरवल गावातील मुख्य रस्त्याची सध्या अत्यंत दुरावस्था असून हा रस्ता पूर्ण खड्डेमय झाला आहे. वाहनचालकांना वाहने चालविणे त्रासदायक होत आहे.त्यामुळे तात्काळ शिरवल गावातील मुख्य रस्त्याचे काम सुरू करावे अन्यथा शिवसेना उबाठाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा लेखी निवेदनातून पिएमवायजीएसचे अभियंता सुतार यांना शिरवल गावचे उपसरपंच प्रविण तांबे यांनी शिवसेना शिष्टमंडळासह दिला*

*यावेळी आमदार वैभव नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, शिवसेना विधानसभा प्रमुख सतिश सावंत , युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले.**

*यावेळी शिरवल गावचे ग्रामस्थ प्रमोद नानचे, तुळशीदास कुडतरकर, गुरुप्रसाद वंजारे, पांडुरंग गुरव आदी उपस्थित होते.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!