तळेरे- वैभववाडी – गगनबावडा – कोल्हापूर मार्ग (करुळ घाट) २२ जानेवारीपासून ते ३१ मार्च पर्यत बंद

तळेरे- वैभववाडी – गगनबावडा – कोल्हापूर मार्ग (करुळ घाट) २२ जानेवारीपासून ते ३१ मार्च पर्यत बंद

*कोंकण Express*

*तळेरे- वैभववाडी – गगनबावडा – कोल्हापूर मार्ग (करुळ घाट) २२ जानेवारीपासून ते ३१ मार्च पर्यत बंद*

*रस्ता दुपदरीकरण सुरू पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन*

*सिंधुदुर्गनगरी, दि.१५ (जि.मा.का):*

तळेरे गगनबावडा रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ जी च्या करूळ

घाटातील ५ किमी भागात दुपदरीकरणाचे काम दिनांक १५ जानेवारी पासून ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत करण्यात येणार आहे, या करुळ घाटात एकेरी वातहूक चालू ठेवणे शक्य नसल्याने या भागात काम सुरु असताना पूर्ण वेळ वाहतूक सुरु ठेवणे शक्य होणार नाही व ते धोकादायक ठरणारे आहे. तसेच डॉगराकडील बाजूचे रुंदीकरण, दरीकडील बाजूस संरक्षक भिंत बांधणीचा विचार करता चालू कामामध्ये एकेरी वाहतूक ठेवणेही सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक होणार आहे. तरी करूळ घाटातील रस्ता दुपदरीकरणाचे काम रात्रंदिवस काम करताना विना अडथळा होण्याकरिता दिनांक १५ जानेवारी ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत राष्ट्रीय महामार्ग क्र १६६ जी वरील सर्व प्रकारची वाहतूक पूर्णवेळ पूर्णतः बंद करून पुढीलप्रमाणे उपलब्ध पर्यायी मार्गावरुन वळविण्यात आली असून या पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

करूळ घाटातील रस्ता दुपदरीकरणाचे काम रात्रदिवस काम करताना विना अडथळा होण्याकरीता तळेरे-वैभववाडी – गगनबावडा कळे कोल्हापूर या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतुक दिनांक २२ जानेवारी ते दिनांक ३१ मार्च २०२४ या कालावधीत पूर्णवेळ वाहतूकीकरिता बंद करण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी किशोर तावडे यांनी जारी केले आहे.

कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग रत्नागिरी यांनी मोटार वाहन कायदा १९८८ कलम ११६ नुसार वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला रस्ता व पर्यायी वाहतूक मार्ग लोकांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी दिशादर्शक फलक, वाहतूक संकेत चिन्हें लोकांना समजेल अशा भाषेत लावण्याची किंवा उभारण्याची कार्यवाही करावी, असे जिल्हादंडाधिकारी किशोर तावडे यांनी आदेशीत केले आहे.

000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!