*कोकण Express*
*आमदार नितेश राणे यांच्या हस्ते वैभववाडी शहरातील विविध विकास कामांचा शुभारंभ*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
वाभवे वैभववाडी नगरपंचायत कार्यक्षेत्रातील विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार नितेश राणे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी, माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, माजी सभापती अरविंद रावराणे, नगराध्यक्षा नेहा माईणकर, सज्जनकाका रावराणे, उपनगराध्यक्ष संजय सावंत, सभापती विवेक रावराणे, नगरसेवक रोहन रावराणे, नगरसेवक डॉ. राजेंद्र पाताडे, बंड्या मांजरेकर, व्यापारी मंडळ अध्यक्ष तेजस आंबेकर, रत्नाकर कदम, नगरसेविका संगीता चव्हाण, यामीनी वळवी, सुंदरा निकम, रेवा बावदाने, राजन तांबे, सुनील भोगले, प्रकाश सावंत, व पदाधिकारी उपस्थित होते.
वाभवे – वैभववाडी शहरातील संभाजी चौक सुशोभीकरण करणे, माईणकरवाडी रस्ता डांबरीकरण करणे, दत्त मंदिर ते सुख नदीपर्यंत काँक्रिटी गटर बांधणे व फूटपाथ तयार करणे, परब घर रस्ता रुंदीकरण व सुशोभीकरण करणे, फोंडा मुख्य रस्ता ते मांजलकरवाडी रस्ता तयार करणे, आदी विकास कामांचा शुभारंभ यावेळी करण्यात आला.
वैभववाडी नगरपंचायतीला आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून जवळपास नऊ कोटीचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतील काही कामे मार्गी लागली आहेत तर काही कामे प्रगतीपथावर आहे.