भारतीय जनता पार्टी वेंगुर्ले यांच्या वतीने राष्ट्रीय युवा दिवसाचे औचित्य साधून वेंगुर्ले बॅ.खर्डेकर महाविद्यालयात उद्बोधन वर्गाचा कार्यक्रम संपन्न

भारतीय जनता पार्टी वेंगुर्ले यांच्या वतीने राष्ट्रीय युवा दिवसाचे औचित्य साधून वेंगुर्ले बॅ.खर्डेकर महाविद्यालयात उद्बोधन वर्गाचा कार्यक्रम संपन्न

*कोंकण Express*

*भारतीय जनता पार्टी वेंगुर्ले यांच्या वतीने राष्ट्रीय युवा दिवसाचे औचित्य साधून वेंगुर्ले बॅ.खर्डेकर महाविद्यालयात उद्बोधन वर्गाचा कार्यक्रम संपन्न*

भारतीय जनता पार्टी वेंगुर्ले यांच्या वतीने राष्ट्रीय युवा दिवसाचे औचित्य साधून वेंगुर्ले बॅ.खर्डेकर महाविद्यालयात नुकतेच उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी राष्ट्र उभारणीत तरूणांचे योगदान या विषयावर मंथन करण्यासाठी दशावतार लोककला अभ्यासक प्रा वैभव खानोलकर उपस्थित होते.
स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम् .बी. चौगले नगर सेवक श्री.गिरप , भाजपचे उपजिल्हाप्रमुख श्री. देसाई,संस्था पदाधिकारी चव्हाण आणि युवा व्याख्याते वैभव खानोलकर यांच्या हस्ते करण्यात आले.
युवकांना विचाराची दिशा मिळावी आणि स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या विचार मंथनातून व्यक्त होताना तरूणांचे स्वामी विवेकानंद यांना अभिप्रेत असणारे तिन तकार नेमके काय आहेत हे आपल्या वैचारिक मंथनातून मांडतात आज तरुणाने नेमके कशा प्रकारे आपली राष्ट्र निष्ठा राखावी या बाबत व्यक्त होताना सर्वात महत्वाचे आहे ते तरूणाईने स्वतः च्या क्षमता, ओळखणे आणि स्वतः मधील सुप्त गुण शोधणं.असे विचार प्रा वैभव खानोलकर यांनी मांडले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.डॉ सचिन परूळकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!