*कोंकण Express*
*कणकवली तालुकास्तरीय बाल,कला, क्रीडा महोत्सवात तळेरे नं.१ शाळेचा समूहनृत्य व समूहगान स्पर्धेत प्रथम क्रमांक*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*
कासार्डे बंडवाडी शाळेत नुकत्याच झालेल्या कणकवली तालुकास्तरीय बाल कला,क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवात तळेरे नं.१ शाळेने लहान गटामध्ये समूहगान व समूहनृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करून दैदिप्यमान यश संपादन करून जिल्हास्तरावरती निवड झाली.या यशाबद्दल तळेरे सरपंच हनुमंत तळेकर, उपसरपंच शैलेश सुर्वे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष- राजेश जाधव उपाध्यक्ष- अनुष्का गोसावी तसेच सर्व सदस्य माजी सभापती दिलीप तळेकर, माजी सरपंच शशांक तळेकर यांनी कौतुक करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यासाठी शाळेतील संपूर्ण शिक्षक वर्ग व अजित गोसावी व श्री प्रणित यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल तळेरे पंचक्रोशीतून विद्यार्थ्याचे आणि शाळेचे कौतुक होत आहे.