*कोकण Express*
*कणकवली येथे महायुती जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा संपन्न*
*महायुतीच्या मेळाव्याला कार्यकर्त्यांची तुफान गर्दी..*
*कणकवली ः प्रतिनिधी*
महायुती मधील पक्षांची या जिल्ह्यात मोठी ताकद आहे, आपल्या सर्वांसाठी २०२४ वर्षे फार महत्त्वाचे आहे. भारत देश महासत्ता कसा बनेल, या साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करीत आहेत. भारत देशामध्ये एकच गॅरंटी चालते ती म्हणजे नरेंद्र मोदी यांचीच गॅरंटी चालते. अयोध्या मध्ये राम मंदिर होत आहे, हे आपले भाग्य आहे. कोणाशीही बोलताना मोदी यानी काय काम केलं हे सांगायचे. आपल्या समोर लढण्यासाठी कोण आहे का? आपण ज्यावेळी प्रामाणिकपणे काम करु तेव्हा पुढच्या निवडणुकीत आमच्याशिवाय कोणीही जिंकू शकत नाही. काँगेस चे मिलिंद देवरा हे शिवसेनेत प्रवेश करीत आहेत, हे राहुल गांधी यांचे अपयश आहे. गेली दहा वर्षे निवडून दिलेला खासदारांने काय केले? विनायक राऊत यांचा कलंक लागलेला आहे . तुम्ही अमिषाला बळी पडू नका. निवडणुकीच्या काळात स्वतः ला समजून काम केले पाहिजे. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी त्याग किती करायचा हे लक्षात घेण्याची गरज आहे. निधीची तडजोड होत नसल्याने काहीजण व्हाया प्रवेश करीत आहेत. भाजपात नाही तर ते शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जातात. देवगड नगरपंचायत नगराध्यक्षांनी शिवसेनेत प्रवेश केला, मात्र दालनात उद्धव ठाकरे आणि
एकनाथ शिंदे यांचाही फोटो आहे, मग आम्ही काय समजायचे ? आग्रे यांनी ही गोष्ट पाहण्याची गरज आहे, असा प्रश्न भाजपा
नेते, आ. नितेश राणे महायुती मेळाव्यात उपस्थित केला.