*कोकण Express*
*राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांच्या निवासस्थानी महिला बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांची सदिच्छा भेट*
*कणकवली ः प्रतिनिधी*
महाराष्ट्राच्या महिला बालविकासमंत्री नामदार अदिती तटकरे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष
अबीद नाईक यांच्या कणकवली शहरातील कामयाब या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्याला मंत्री तटकरे यांनी उपस्थित राहून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केले. कार्यकर्ता मेळावा संपन्न झाल्यावर मंत्री तटकरे यानी थेट राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांच्या निवासस्थानी गेल्या. नाईक कुटुंबियांकडून मंत्री तटकरे यांचे पुष्पगुच्छ देत स्वागत करण्यात आले, नाईक कुटुंबीयांकडून आपुलकीने चहापानाचा आस्वाद घेत मंत्री तटकरे यांनी नाईक कुटुंबियांशी गप्पा मारल्या. विशेषतः राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या सुकन्या इकरा, रिझा, अबीद यांचे बंधू शासकीय ठेकेदार अनिस नाईक यांची कन्या महेक, चिरंजीव अली यांच्याशी मंत्री तटकरे यांनी दिलखुलास वार्तालाप केला, यावेळी अबिद नाईक यांचे वडील अब्दुल नाईक, आई हवाबी नाईक, अबीद नाईक, अनिस नाईक, आसिफ नाईक हुमेरा नाईक इकरा नाईक, रिझा नाईक, महेक नाईक, राष्ट्रवादी चे कार्याध्यक्ष काका कुडाळकर, सावळाराम आणावकर एम के गावडे, सुरेश गवस, विलास गावकार, निशू कडुलकर, केदार खोत अमित केतकर, गणेश चौगुले, सचिन अडुळकर आदी उपस्थित होते.