कल्याण सावंतवाडी रेल्वे सुरू करण्यासाठी सह्यांची मोहीम

कल्याण सावंतवाडी रेल्वे सुरू करण्यासाठी सह्यांची मोहीम

*कोंकण Express*

*कल्याण सावंतवाडी रेल्वे सुरू करण्यासाठी सह्यांची मोहीम..*

*टिटवाळा ..यशवंत परब*

रेल्वे प्रवासी सामाजिक संस्था कल्याण सावंतवाडी रजि.अध्यक्ष सुनील उतेकर आणि कोंकण रहिवाशी मंडळ टिटवाळा रजि.संस्थापक अध्यक्ष बुवा यशवंत परब ,उपाध्यक्ष शंकर पेडूरकर,सचिव निलेश राणे,खजिनदार,गुणाजी गावडे,कार्याध्यक्ष प्रवीण टोले,सचिन परब, प्रकाश चौगुले,सौ.सिमा पिपुटकर,सौ.प्रेमलता तावडे सल्लागार संतोष राणे आणि सहकारी यांनी कोंकणात प्रवाशांसाठी कल्याण सावंतवाडी रेल्वे सुरू करण्यासाठी टिटवाळा येथे सह्यांची मोहीम सुरू केली .
कोंकणातील चाकरमानी नोकरदार याना कोंकणात जाण्यासाठी नेहमी गर्दीचा सामना करावा लागतो यामुळे अनेकदा अपघातही झाले आहेत , आपल्या मुला बालांसह सणवार होळी गणपती तसेच इतर वेळेस रेल्वेने जाणे गर्दीमुळे धोक्याचे झाले आहे यासाठी कल्याण आणि परिसरात लाखो कोंकणकर राहतात यासाठी कल्याण ते सावंतवाडी रेल्वे सुरू व्हावी यासाठी संघटना अध्यक्ष सुनील उतेकर आणि सहकारी गेल्या अनेक वर्षापासून रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत .
याला अनुसरून कोंकण रेल्वे प्रवासी मागणी याकडे प्रशासनाचे लक्ष जावून रेल्वे सुरू व्हावी यासाठी अनेल रेल्वे स्टेशन परिसरात सह्यांची मोहीम सुरू होणार आहे याची सुरुवात टिटवाळा रेल्वे स्टेशन येथून करण्यात आली . मांडा टिटवाळा रिक्षा युनियन अध्यक्ष बाळा भोईर यांच्या हस्ते सुरुवात केली . रेल्वे प्रवासी सामाजिक संस्था अध्यक्ष सुनील उतेकर, यशवंत परब अध्यक्ष ,संपादक संभाजी मोरे ,राजेंद्र गावडे,गोपिचंद घाटये, दिलीप गायकवाड ,योगेश चांदोरकर सौ.करूणा परब,सुपर्णा गावडे, सुनीता खोकले,स्नेहा मिटबावकर तसेच शेकडो कोंकणकर उपस्थित होते.
यावेळी कोंकणात नवीन आणि हक्काची कल्याण सावंतवाडी रेल्वे सुरू व्हावी यासाठी हजारो नागरिकांनी सहभाग घेतला.

यावेळी संस्थेने नवीन नियुक्ती देऊन पदे देण्यात आली त्यांना प्रमाण पत्र ,शाल ,पुश्पगुछा देऊन सन्मान करण्यात आला
अनेक मान्यवर व्यक्तीचा शाल,पुश्पगुछा देऊन सन्मान केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!