*कोंकण Express*
*छत्रपती शिवाजी महाराज रिक्षा स्टॅण्ड येथे नगरपंचायत जेष्ठ कर्मचारी यांचा गौरव*
*आज दिनांक १२/०१/२०२४ कणकवली बस स्थानका समोरील “छत्रपती शिवाजी महाराज” रिक्षा स्टॅण्ड येथे नगरपंचायत चे जेष्ठ कर्मचारी किशोर धुमाळे यांना गौरवण्यात आले,
*माऊली मित्र मंडळ व संलग्न जुना भाजी मार्केट व्यापारी मित्र मंडळाचे वतीने नुरूभाई, जमिल, कुरैशी, सईद नाईक ,हेमंत नाडकर्णी यांच्या उपस्थितीत सचिन कुवळेकर यांच्या हस्ते किशोर धुमाळे यांना शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले,
*यावेळी छत्रपती शिवाजी महाराज स्टॅण्ड येथील सर्व रिक्षा चालक मालक, उपस्थित नागरिक, सर्व मंडळाचे अविनाश गावडे, भगवान कासले, प्रसाद पाताडे ,बाबुराव घाडिगावकर, विशाल रजपूत, सुनिल काणेकर, प्रसाद उगवेकर, संतोष महाजन, रंगाराव पवार सर्व पदाधिकारी व संलग्न मित्र मंडळाचे सदस्य उपस्थितीत होते,
*यावेळी सर्व मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी असे म्हटले की, आमच्या कणकवली शहराला भारत सरकारने स्वच्छता अभियानात अंतर्गत,”स्वच्छ कणकवली शहर”म्हणून नामांकित केले, आणि म्हणूनच आम्ही आमच्या मंडळाचे वतीने किशोर धुमाळे यांना गौरविले, किशोर धुमाळे यांच्या च मार्गदर्शनाखाली आमच्या कणकवली नगरपंचायत चा सर्व कारभार चालतो, असे आम्हाला वाटते, आणि याचा एक मित्र म्हणून आम्हाला सार्थ अभिमान वाटतो, याही पुढे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संपूर्ण कर्मचारी वर्गाच्या अथक परिश्रमा च्या माध्यमातून, आमच्या कणकवली शहराचे नाव संपूर्ण भारतात एक आदर्शवत शहर म्हणून ओळखले जावे,
*याप्रसंगी उपस्थितीत सर्वांनी गौरव मूर्तींचे अभिनंदन करून, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या,