*कोंकण Express*
*फोंडाघाट चे लाडके ग्रामसेवक पेडणेकरभाऊ यांचे दुःखद निधन !*
*फोंडाघाट ः प्रतिनिधी*
बाजारपेठेतील सर्वांचे लाडके निवृत्त ग्रामसेवक सुभाष यशवंत पेडणेकर ( वय ७८ वर्षे) यांचे काल सायंकाळी पाच वाजता, राहत्या घरी,वृद्धापकाळातील अल्पशा आजारामध्ये, हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यात दुःखद निधन झाले. पेडणेकरभाऊ या नावाने ते सर्वत्र सुपरीचित होते. त्यांनी मणचे, घोणसरी, तिवरे – डामरे- कोंड्ये, आणि फोंडाघाट मध्ये ग्रामसेवक म्हणुन काम केले. प्रशासकीय कामाची अभ्यासपूर्ण हातोटी, अधिकारी वर्गाशी प्रामाणिक, विश्वासार्ह वर्तन तसेच गोरगरिबांसाठी जिव्हाळा,अशा त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे त्यांचा लोकसंग्रह अफाट आणि सौदार्यपूर्ण होता. किंबहुना यांनी आपला कार्यकाळ आजच्या प्रशासकीय कामासाठी मार्गदर्शक केला होता. निवृत्तीच्या वेळी आलेली ग्राम विस्तार अधिकारी म्हणून पदबढती त्यांनी सौजन्यपूर्वक नाकारली होती.ं त्यांच्या निधनाबद्दल पंचक्रोशी मध्ये दुःख व्यक्त होत आहे.
त्यांचे पश्चात पत्नी,एक मुलगा, दोन मुली, भाऊ -बहिणी असा परिवार आहे. फोंडाघाट हायस्कूलचे विद्यार्थीप्रिय शिक्षक महेश पेडणेकर सरांचे आणि माजी सिंधुदुर्ग क्वीन अश्विनी पेडणेकर यांचे ते पिताश्री होत. रात्री उशिरा यांचे अंत्ययात्रेत सर्व स्तरातील मित्रपरिवार- ग्रामस्थ, यांनी सहभागी होऊन त्यांना आदरांजली वाहीली.