*कोंकण Express*
*मनसे कडून स्त्रीरोगतज्ञ डॉ प्रियांका म्हसकर यांचे स्वागत*
कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रियांका मोहन म्हसकर यांना महाराष्ट्र वैद्यकिय व आरोग्य सेवा गट-अ संवर्गातील वैद्यकिय अधिकारी गट-अ या पदावर “कंत्राटी वैद्यकिय अधिकारी” म्हणून नियुक्ती देण्यात आली डॉ. प्रियांका म्हसकर यांनी पदभार स्वीकारला असून रुग्णांच्या सेवेत दाखल झाल्या असता मनसे पदाधिकार्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या त्यावेळी मनसे तालुका अध्यक्ष शांताराम सादये, संतोष कुडाळकर ,रश्मी दाभोळकर, योगेश कदम, शरद सावंत उपस्थित होते