*कोंकण Express*
*आज कासार्डे विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न*
*मान्यवरांची उपस्थिती.
*कासार्डे प्रतिनिधि : संजय भोसले.*
कासार्डे विकास मंडळ, मुंबई संचलित, कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ तसेच निवृत्ती शिक्षकाचा सेवापूर्ती सत्कार समारंभ आज गुरुवार दि.४ जाने 2024 रोजी स . १० वा.मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
बक्षीस वितरण कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवलीचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड अध्यक्ष म्हणून तर प्रमुख पाहुणे म्हणून भगीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.प्रसाद देवधर उपस्थित राहणार आहे. तसेच प्रमुख अतिथी म्हणून कासार्डे विकास मंडळ, मुंबईचे अध्यक्ष परशुराम माईणकर, स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे, स्कूल कमिटी चेअरमन अरविंद कुडतरकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमात कासार्डे विद्यालयचे निवृत्त कलाशिक्षक सी.एस.कल्याणकर यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ व प्रशालेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे.याशिवाय विद्यार्थ्यी लिखित “मेघदूत” चे प्रकाशनही याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. शुक्रवार दि.५जानेवारी रोजी रात्री ९ वा. विविध गुणदर्शनाचा बहारदार कार्यक्रम सादर करणार आहे.तरी सर्व कार्यक्रमाला पालक,ग्रामस्थ ,व आजी माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन प्रशालेचे मुख्याध्यापक एम.डी.खाड्ये,
प्र.मुख्याध्यापक एन.सी. कुचेकर शालेय मुख्यमंत्री शुभम राणे यांनी केले आहे.