*कोकण Express*
*प्रभू श्री राम यांचा अवमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांनी स्वतःचे धर्मांतर करावे*
*आमदार नितेश राणे यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा घेतला खरपूस समाचार*
*सातत्याने देवतांच्या होणाऱ्या अपमानाचा सकल हिंदू समाजाने विचार करावा*
*कणकवली ः प्रतिनिधी*
आपल्या देशात हिंदू देवतेचे अपमान करण्याची स्पर्धा काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षा मध्ये सुरू आहे. प्रभू श्री राम यांनी १४ वर्षे कंदमुळे खाऊन वनवासात राहिले असे पुरावे आहेत. मात्र मांसाहार केला अशी मुंब्राच्या जितू उद्देन म्हणजेच आमदार जितेंद्र आव्हाड ने गरळ ओकली आहे.प्रत्येक वेळी हिंदू देव देवता आणि हिंदू धर्माचा अपमान केला जातो याचा सकल हिंदू समाजाने विचार करण्याची गरज आहे.असे आवाहन करतानाच आमदार नितेश राणे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा खरपुर समाचार घेतला.आमदार आव्हाड याने प्रभू श्री राम यांच्याबद्दल च्या वक्तव्याचे पुरावे द्यावेत.जर पुरावा नसेल तर धर्मांतर करावे आणि मुंब्रा येथे जितुद्दीन म्हणून राहावे.अशी जळजळीत टीका भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी केली.ते कणकवलीत प्रहार भवन येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
जी हिम्मत प्रभू श्री राम यांचे बाबत करतात तीच हिम्मत इतर धर्माचा आणि त्यांच्या देवतांचा अपमान केला असता तर जिवंत ठेवले असते काय ? असा सवाल करत सगळे प्रयोग आणि हिम्मत फक्त हिंदू देवता आणि धर्मा बद्दल दाखविली जाते. चमकूगिरी करायची खरच जितू उद्देन ( जितेंद्र आव्हाड) मध्ये हिंमत असेल तर जाहीर सभेत बोलावे असे आव्हान आमदार नितेश राणे यांनी दिले.
आमच्या मित्र रोहित पवार ला लवकर अक्कल आली.म्हणून त्याने आव्हाड ना रोखले मात्र तुम्ही खर हिंदू असाल तर जितेंद्र आव्हाड ची पक्षातून हकालपट्टी करून दाखवावी असे आव्हान आमदार नितेश राणे यांनी दिले.
संजय राऊत याना महानंदा जागे बाबत चिंता आहे की? रेस्ट हाऊस मध्ये तुला रशियन चित्रपट बघायला आवडतात त्या चित्रपटांची चिंता आहे.? त्या ठिकाणी ३५० कोकणातील कामगार आहेत त्यामुळे आम्हाला महानंदा डेअरी ची काळजी आहे. ती आम्ही व्यवस्थित चालविण्यात आहोत.आमचं महायुतीच सरकार तुमच्या सारखा लुटारू नाही. योग्य तो निर्णय आमचे सरकार घेईन भांग पिऊन किती ही बडबडला तरी आम्ही तुम्हाला विचारत नाही.
अंगणवाडी सेविका चा प्रश्न महाविकास आघाडी पासून आहे.स्वतःच्या मेहुण्यांची काळजी होती तेवढी अंगणवाडी सेविकांची काळजी उद्धव ठाकरे यांनी घेतली असती तर अंगणवाडी सेविकांचा प्रश्न ते मुख्यमंत्री असताना सुटला असता मात्र आम्ही महायुती सरकार म्हणून अंगणवाडी सेविकांना निश्चितच न्याय मिळवून देणार असे आमदार नितेश राणे यांनी सांगितले.