कणकवली वन क्षेत्रातील झाडांची अनधिकृत झालेली तोड

कणकवली वन क्षेत्रातील झाडांची अनधिकृत झालेली तोड

*कोकण Express*

*कणकवली वन क्षेत्रातील झाडांची अनधिकृत झालेली तोड*

*कणकवली राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष अनंत पिळणकर*

कणकवली फोंडा गंगोवाडी इथे सर्वे नंबर 456/5 इथे वनसंज्ञा क्षेत्र असताना कणकवली आरएफओ राजेंद्र घुणकीकर व लेखापाल जयमाला राठोड यांच्या परवानगीने झालेली झाडांची अनधिकृत तोड पासासहित कशी करण्यात आली असा सवाल कणकवली राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष अनंत पिळणक यांनी केला आहे.

कोल्हापूर येथून अधिकारी येऊन मालकाची जबाब घेऊनही अद्याप कारवाई झालेली नाही. याच्यावर जिल्ह्याचे वनसंरक्षक लक्ष देणार आहेत की नाही कारवाई करणार आहेत की नाही असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडला आहे. अनेक अनधिकृत प्रकरणांना वनसंरक्षक किती पाठीशी घालणार आहेत कणकवली येथील रेंज ऑफिसच्या गैरप्रकाराबाबत अनेक वेळा वाचा फोडण्याचा प्रयत्न आपण केला आहे. परंतु सगळ्या अधिकाऱ्यांचे साठे लोटे असल्याचे निदर्शनास आलेला आहे. नाहीतर अशा गैर कृत्य कामांना पास सहित मंजुरी कशी दिली जाते आणि अशा अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दुर्दैव असल्याचेही पिळणकर यांनी सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!