*कोंकण Express “
*उबाठा गटाचे विभागप्रमुख अतुल दळवीचा मनसेत प्रवेश*
आज कणकवली विधानसभा मतदार संघाची आढावा बैठक कणकवली येथील शासकीय विश्रामगृह येथे पार पडली. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे विभागप्रमुख श्री. अतुल दळवी यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे देवगड विधानसभा संपर्क अध्यक्ष श्री. संतोष शिंगाडे यांच्या आणि उपजिल्हा अध्यक्ष श्री. गणेश वाईरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला. प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कणकवली तालुका अध्यक्ष श्री. शांताराम सादये, मनविसे उपजिल्हा अध्यक्ष श्री. अनिकेत तर्फे, मनविसे माजी वैभववाडी संपर्क अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर मोरे, मनसे माजी उपतालुका अध्यक्ष श्री. अनंत आचरेकर, माजी तालुका सचिव श्री. संतोष कुडाळकर, श्री. दत्ताराम अमृते, समीर तेली, योगेश कदम,माजी शहर अध्यक्ष श्री.शरद सावंत, कु. प्रतिक भाट उपस्थित होते.