*कोकण Express*
*भाजपासोबतची युती तोडल्याने शिसवेना पक्ष कोकणासह,महाराष्ट्रात वाढतोय ; सतीश सावंत*
*बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर ; शेकडो हुन अधिक रक्तदात्याचा सहभाग … !*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कोकणाचा विकास सेनेच्या माध्यमातून हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच झाला.कोकणातील सर्वसामान्यतः घरातील व्यक्तीला मुख्यमंत्री,खासदार,आमदार, नगरसेवक हि पदे मिळणे हे केवळ बाळासाहेबांनमुळे शक्य झाले आहे.१९९५ नंतर पुन्हा शिवसेना पक्षाचा मुख्यमंत्री विराजमान झाला असून भाजपासोबतची युती तोडल्याने शिसवेना पक्ष कोकणासह,महाराष्ट्रात वाढत आहे. तसेच बाळासाहेबांचे विचार घेतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे नेतृत्व करत आहेत.सर्वांच्या सांघिक कामातून विधानभवनावर भगवा फडकवत बाळासाहेबांचे स्वप्न साकार करूया असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचा शुभारंभ जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते करण्यात आला.कनेडी समाधि पुरुष हॉल येथेशिवसेना नाटळ व हरकुळ बुद्रुक विभागाच्या वतीने या रक्तदानशिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये १०२ हुन अधीक रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. यावेळी भैरवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुलजी रावराणे, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्टी, तालुकाप्रमुख डॉ. प्रथमेश सावंत, जिल्हा महिला आघाडी प्रमुख निलम पालव, तालुकाप्रमुख अल्पसंख्याक निसार शेख, नगरसेवक सुशांत नाईक, विभाग प्रमुख बंड्या रासम, विभागप्रमुख आनंद आचरेकर, जि.प.सदस्या राजलक्ष्मी डीचवलकर, जि. प. सदस्या स्वरूपा विखाळे,पं. स. सदस्य मंगेश सावंत,प्रदीप सावंत,मीनल तळगावकर, अंजली सापळे, डॉ.विजय गावकर, माधवी दळवी आदी पदाधिकारि कार्यकर्ते उपस्थित होते. सावंत पुढे म्हणाले, सेनेच्या माध्यमातून होत असलेल्या समाजभिमुक ,आरोग्य तसेच विकासकामामुळे सेना सर्वत्र फोपावली पाहिजे.अशा दृष्टीने काम करा. हरकूळ- नाटळ विभाभागातून जी.प.मध्ये सेनेचा उमेदवार निवडून देवून बाळासाहेबांना अभिप्रेत असे काम उभारूया असे आवाहन त्यांनी केले. अतुल रावराणे म्हणाले,बाळासाहेब हे हिंदुत्वाचे कैवारी होते.मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी काढलेल्या सन्घटनेतून पुढे शिसवेना पक्ष उदयास आला.अस्मिता जपायला व लढण्याची शिकवण हि बाळासाहेबांनी शिवसैनिकांनी दिली. त्याच्या शिकवणीतून आपण पुढे जात सेनेला अधिक भक्क्म करण्यासाठी प्रयत्न करूया.तीन चाकाच सरकार म्हणून विरोधकांनी हिणवलं मात्र त्याच मुख्यमंत्र्यानी कोरोना सारख्या महामारीत यशस्वी मुख्यमंत्र्याच्या यादीत टॉप ५ मध्ये नाव नोंदवल गेल्याचा अभिमान असल्याचे सांगितले. डॉ.प्रथमेश सावंत म्हणाले,शिवसेनापक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती शिवसेना नाटळ आणि हरकुळ विभागाच्या वतीने दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमाने साजरी केली जाते.मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा ब्लड बँकेत पुरेसा रक्तसाठा असणे आवश्यक आहे. त्यामुळे सामाजिक भान राखत यावर्षी रक्तदान शिबिर आयोजन केल्याचे सांगत रक्तदात्यांचे ऋण व्यक्त केले. नीलम पालव व डॉ.विजय गावकर यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांना बँकनिवडणुकीसाठी सत्कार करत शुभेच्छा देण्यात आल्या. सायंकाळी महिलासाठी हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आला.या कर्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार विभागप्रमुख आनंद आचरेकर यांनी मानले.