*कोकण Express*
*१ जानेवारीला एकता दिव्यांग विकास संस्थेची विशेष बैठक*
*दिव्यांगांच्या विविध प्रश्नांवर होणार चर्चा ; प्रशासनाचे लक्षही वेधणार*
*कणकवली ः प्रतिनिधी
१ जानेवारी रोजी एकता दिव्यांग विकास संस्थेची विशेष बैठक कणकवली येथील गोपुरी आश्रम याठिकाणी सकाळी १० वा. आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत अधिकऱ्यांना देण्यात आलेल्या मागील निवेदनांचा आढावा, दिव्यांग व्यक्तींच्या समस्या, तसेच विशेष म्हणजे दिव्यांग व्यक्तींनी केलेले अनुदान अर्ज मंजूर न झाले असल्यास त्याबाबत पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
तसेच व्यवसायासाठी नवीन अनुदान अर्ज करण्यासाठी योग्य मार्गदर्शन केले जाणार आहे. तरी या बैठकीला कणकवली तालुक्यातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील दिव्यांग व्यक्ती किंवा नातेवाईकांनी उपस्थित राहायचे आहे. ज्या दिव्यांग व्यक्तींनी मागील तसेच चालू वर्षी वेगवेगळ्या अनुदान अर्जाच्या केलेल्या प्रस्तावांचे घेण्यात आलेल्या पोच ( दुय्यम प्रत ) या बैठकी वेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडे जमा करायच्या आहेत. अधिक माहितीसाठी सचिन सादये – ९८६०७१८९४९ तसेच मयुर ठाकूर – ९११९५३२८७० या नंबर वर संपर्क करून माहिती घ्यावी अशी, सूचना देखील संस्थेच्या माध्यमातून करण्यात आली आहे.