*कोकण Express*
*सावंतवाडी शिवसेनेच्यावतीने बाळासाहेबांची जयंती उत्साहात साजरी…*
हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आज सावंतवाडी शिवसेनेच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली.माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या येथील कार्यालयात हा कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी “हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो”…, “शिवसेना झिंदाबाद”, अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी तालुकाप्रमुख रूपेश राऊळ,अशोक दळवी,शब्बीर मणियार,सुरेंद्र बांदेकर,सुरेश भोगटे,भारती मोरे,शुभांगी सुकी,रश्मी माळोदे, दिपाली सावंत,आमिशा शेख, लक्ष्मी मेस्त्री,नीता कविटकर,प्रगती बामणे,गजानन नाटेकर आदींसह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.